Thane crime news : झुकला नाही, तर लढला; सराफा व्यापाऱ्याने प्रसंगावधान दाखवल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला

Thane crime news : झुकला नाही, तर लढला; सराफा व्यापाऱ्याने प्रसंगावधान दाखवल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला

ठाण्यात बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला आहे. सराफा व्यापाऱ्याने प्रसंगावधान दाखवत प्रतिकार केल्याने दरोडेखोर पळून गेले. कापूरवाडी येथील बाळकूमपाडा भागामध्ये बुधवारी ही घटना घडली. या सर्व थरारक प्रकार दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळकून पाडा क्र.2 भागामध्ये ‘दर्शन ज्वेलर्स’ नावाचा सराफा दुकान आहे. या दुकानामध्ये सकाळी साडे अकराच्या सुमारास चार जण घुसले. यापैकी एकाकडे बंदुक होती आणि त्याचा धाक दाखवून दरोडेखोरांनी दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र सराफा व्यापाऱ्याने प्रसंगावधान दाखवत प्रतिकार केला. जवळील लाकडी दांडक्याने सराफा व्यापाऱ्याने चौघांना चांगलेच चोपून काढले. या सर्व झटापटीत तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले, तर चौथ्या आरोपीला स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;