शिवसेना भवनाच्या प्रांगणात आज ध्वजारोहण; उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

शिवसेना भवनाच्या प्रांगणात आज ध्वजारोहण; उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

वेळः सकाळी 8 वा.

देशाच्या स्वातंत्र्यदिनी उद्या दादर येथील शिवसेना भवनाच्या प्रांगणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  ध्वजारोहण केले जाणार आहे. त्याप्रसंगी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.

15 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिशांच्या जोखडातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी असंख्य देशभक्तांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यलढय़ात झोकून दिले. देशासाठी प्राणांची आहुती दिली. शिवसेनेनेही देशाभिमान सदैव जपला. 15 ऑगस्टला स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तिरंगा राष्ट्रध्वज फडकवून देशाप्रति आदर व्यक्त केला जातो. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी दिली जाणार आहे.

ध्वजारोहणाला शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, विभागप्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;