आशा पारेख, शिवाजी साटम यांना ‘जीवनगौरव’

आशा पारेख, शिवाजी साटम यांना ‘जीवनगौरव’

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सन 2023 चा ‘राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक एन. चंद्रा आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता वरळी येथील एनएससीआय डोममध्ये विशेष समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये 10 लाख, मानपत्र व मानचिन्ह असे असून विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये 6 लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे.  चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये 10 लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये 6 लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;