खोटे गुन्हे दाखल करून मला तुरुंगात टाकले; व्याजासह परतफेड करणार, अद्वय हिरे यांचा इशारा

खोटे गुन्हे दाखल करून मला तुरुंगात टाकले; व्याजासह परतफेड करणार, अद्वय हिरे यांचा इशारा

केवळ राजकीय सूडापोटी माझ्यावर खोटे आरोप केले गेले. खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकले. याबाबत मी श्वेतपत्रिका काढणार आहे आणि ज्यांनी मला हकनाक तुरुंगात टाकले, त्या सत्ताधाऱ्यांची व पोलीस, प्रशासनाची व्याजासह परतफेड करीन, असा इशारा शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांनी दिला.

मालेगावातील रेणुका देवी सहकारी सूत गिरणीसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या साडेसात कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम थकविल्याप्रकरणी राजकीय दबावातून अद्वय हिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नऊ महिन्यांपासून ते तुरुंगात होते. सोमवारी, 12 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. बुधवारी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. नाशिक व मालेगावातून आलेल्या असंख्य शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.   जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, सहसंपर्पप्रमुख दत्ता गायकवाड, ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यावेळी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांच्याकडून विचारपूस

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अद्वय हिरे यांना फोन करून विचारपूस केली, त्यांच्याशी चर्चा केली. शिवसेना कायम आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;