Nagar News – शेजाऱ्याने घात केला; दागिन्यांसाठी वृद्ध महिलेची गळा आवळून हत्या, आरोपी गजाआड

Nagar News – शेजाऱ्याने घात केला; दागिन्यांसाठी वृद्ध महिलेची गळा आवळून हत्या, आरोपी गजाआड

राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारात एका ऊसाच्या शेतात काल दुपारी सुमन विटनोर (67 वर्ष) या वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर अवघ्या काही तासात राहुरी पोलीस पथकाने महिलेचा खून करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून गजाआड करत गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले.

राहुरी तालुक्यातील मांजरी येथील शिक्षक कैलास विटनोर, विलास विटनोर, भगवान यांच्या मातोश्री सुमन सावळेरराम विटनोर या रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्या उशीरा पर्यंत घरी न गेल्याने सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला होता. काल दि. 13 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी तीनच्या दरम्यान मांजरी येथील चोपडे यांच्या उसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत सुमन सावळेरराम विटनोर यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी मयत महिलेच्या अंगावरील सुमारे तीन ते चार तोळे सोन्याचे दागीने ओरबडून घेल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे, धर्मराज पाटील यांच्यासह पोलीस हवालदार सुरज गायकवाड, अशोक शिंदे, राहुल यादव, विकास साळवे, अमित राठोड, दीपक फुंदे, सचिन ताजणे, नदीम शेख, अंकुश भोसले आदि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ञांचे पथक घटनास्थळी हजर झाले. यावेळी श्वान घटनास्थळाच्या जवळच घुटमळले. त्यानंतर पोलीस पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरु केला.

दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलीस पथकाने मयत महिलेच्या शेजारीच राहणारा संदिप ऊर्फ संजू चोपडे याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूली दिली. आरोपी चोपडे याने मयत वृद्ध महिलेला एका ऊसाच्या शेतात जबरदस्ती नेऊन गळा दाबून ठार मारले. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागीने काढून घेतले. तसेच मृतदेहाची ओळख पटू नये, म्हणून आरोपीने मयत महिलेच्या अंगावरील लुगडे काढून चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. काल दुपारी घटना उघडकीस आल्यानंतर राहुरी पोलीस पथकाने अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळून गजाआड केले.

आरोपी संदिप ऊर्फ संजू अशोक चोपडे (वय 35 वर्षे) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 921/2024 भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम 103 (1), 311 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाकडून त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक धर्मराज पाटील हे करीत आहेत. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या काही तासात ताब्यात घेऊन गजाआड करुन गुन्ह्यातील उकल करणाऱ्या राहुरी पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;