Ratnagiri News – बॅंकेच्या क्रेडिट कार्डवरुन दीड लाखाची ऑनलाईन फसवणूक

Ratnagiri News –  बॅंकेच्या क्रेडिट कार्डवरुन दीड लाखाची ऑनलाईन फसवणूक

बॅंकेच्या क्रेडिट कार्डवरुन दीड लाखाची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या अज्ञात संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे घरी असताना त्यांच्या मोबाईल क्रमांवर असलेले रिवॉर्ड रिडीम करण्यासाठी आलेल्या टेक्स मेसेज मधील लिंकवर त्यांनी क्लिक केले असता ॲक्सीस बॅकेंच्या इंटरनेट बॅकिंगसारखे पेज ओपन झाले. फिर्यादी यांनी त्या पेज मध्ये त्यांच्या ॲक्सीस बॅकेच्या क्रेडीटची माहिती भरत गेल्यानंतर त्यांच्या ॲक्सीस बॅंकेच्या क्रेडिट कार्डवरुन अज्ञाताने 1 लाख 50 हजार रुपये डेबीट झाले. कोणीतरी अज्ञाताने फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचा दावा फिर्यादी यांनी केला. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;