छोट्या पुढारीसोबत बिग बॉसच्या घरात हैराण करणारा व्यवहार, निखिल दामलेच्या विरोधात लोकांचा संताप, थेट धक्के आणि…

छोट्या पुढारीसोबत बिग बॉसच्या घरात हैराण करणारा व्यवहार, निखिल दामलेच्या विरोधात लोकांचा संताप, थेट धक्के आणि…

बिग बॉस मराठी 5 धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनची मोठी क्रेझ ही प्रेक्षकांमध्ये बघायला मिळते. बिग बॉस मराठीच्या घरात मोठा हंगामा होताना देखील दिसतोय. अनेक चर्चेत असलेली नावे या सीजनमध्ये दाखल झाली आहेत. छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे हा देखील या सीजनमध्ये सहभागी झालाय. विशेष म्हणजे घनश्याम दरोडे हा धमाकेदार गेम खेळताना दिसतोय. बारामतीचा सूरज चव्हाण हा देखील चर्चेत आहे. दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगांवकर या देखील या शोमध्ये पोहोचल्या आहेत. बिग बॉसच्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांना एक टास्क देण्यात आला. या टास्कसाठी घरातील सदस्य दोन टीममध्ये विभागले गेले होते.

बिग बॉसने घरात दोन बेबी पाठवले होते. या दोन बेबीची काळजी घरातील सर्व सदस्यांना मिळून घ्यायची होती. त्याची लंघोटी बदलणे असे काम घरातील सदस्यांना करायची होती. यावेळी घनश्याम याच्याकडे बाळाची लंघोटी बदलण्याचे काम होते. यासाठी त्याला पुलमध्ये जाऊन अंग भिजवून यायचे होते. घनश्याम हे सर्व व्यवस्थितपणे करत होता.

बाळाची लंघोटी बदलण्यापासून घनश्याम याला रोखले जात होते. हेच नाही तर बिग बॉसच्या घरात एकमेकांना धक्के मारणे किंवा धक्के देणे हे नियमांच्या बाहेर आहे. मात्र, बाळाची लंघोटी बदलण्यापासून रोखण्यासाठी घनश्याम दरोडे याला चक्क निखिल दामले हा धक्के मारताना दिसला. हेच नाही तर यावर घनश्याम दरोडो म्हणाला की, मला धक्के मारले जात आहेत.

निखिल दामले याने घनश्याम याला इतका जोरात धक्का मारला की, तो थेट साईटला गेला. यावेळी घनश्याम दरोडे याच्याकडून बिग बॉसकडे देखील तक्रार करण्यात आली. घनश्याम दरोडे म्हणाला की, बिग बॉस हे मला धक्के मारत आहे. इथे धक्काबुक्की होत आहे. निखिल दामले याचे हे वागणे प्रेक्षकांना अजिबातच आवडले नसल्याचे बघायला मिळतंय.

हेच नाही तर या प्रकारानंतर अनेकांनी थेट निखिल दामले याच्यावरच जोरदार टीका करण्यास सुरूवात केलीये. घनश्याम दरोडे हा वयाने जरी 22 वर्षाचा असला तरीही तो अगदी लहान मुलांसारखा दिसतो. त्याला अशाप्रकारे धक्के मारणे चुकीचे असल्याचे सर्वांचे मत आहे. घनश्याम दरोडे याला छोटा पुढारी म्हणूनही ओळखले जाते. घनश्याम दरोडे नेहमीच चर्चेत असणारे एक नाव आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;