लग्नाच्या 5 महिन्यांतच ‘बिग बॉस मराठी 5’मध्ये जाण्याविषयी सासरचे काय म्हणाले? योगिताकडून खुलासा
कलर्स मराठी वाहिनीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण नायिका म्हणून झळकली होती. सर्वगुणसंपन्न, हवीहवीशी वाटणाऱ्या तिच्या अंतरा या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सिझनमध्येही तिचा चांगलाच बोलबाला आहे.
सातारकर असणाऱ्या योगिताचा जन्म ठाण्यात झाला आहे. नृत्यात करिअर करण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे 'मराठी बाणा' या कार्यक्रमात ती सहभागी झाली. इंडस्ट्रीत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून तिने काम सुरू केलं. पडद्यामागे काम करत सुरू झालेला तिचा प्रवास आता 'बिग बॉस मराठी'पर्यंत पोहोचला आहे.
'बिग बॉस मराठी'बद्दल बोलताना योगिता म्हणाली, "'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून योगिता काय आहे हे प्रेक्षकांना कळणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. 100 दिवस सोशल मीडिया आणि फोनपासून मी दूर असणार आहे."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List