Rohit Pawar News – अजित पवारांवर दिल्लीतल्या दोन गुजराती नेत्यांचा दबाव, रोहित पवार यांचा आरोप
सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणे ही चूक होती अशी कबुली अजित पवार यांनी दिली होती. पण अजित पवार यांच्यावर दिल्लीतल्या दोन गुजराती नेत्यांचा दबाव होता अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसेच अजित पवारांनी भाजपचं मांडलिकत्व पत्करलं असेही रोहित पवार म्हणाले.
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणे आपली चूक होती अशी कबुली अजित पवार यांनी जय महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली होती. त्यावर रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट लिहून प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की,सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय अजित पवारांचा होऊच शकत नाही अशी मला खात्री होती. ही चूक असल्याची कबुली अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखातीत दिली. पण अजित पवारांचे मित्रपक्ष उल्टा प्रचार करत आहेत की, हा निर्णय अजित पवारांचाच होता. याला तुम्ही चूक झाल्याचे नाव देत असाल तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता असे रोहित पवार म्हणाले. तसेच आता विधानसभा निवडणुकीसाठी माझा मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर दबाव असल्याची चर्चा आहे असा आरोपही रोहित पवारांनी केला आहे.
तसेच दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय आहे असे रोहित पवार म्हणालेत पण स्वाभिमान, विचारसरणी आणि शरद पवार यांना सोडून अजित पवार यांनी भाजपचं मांडलिकत्व स्विकारलं. यामुळे एक क्षमता असेलेला नेत बळीचा बकरा ठरला. याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि पुतण्या म्हणून मला कायम दुःख वाटेल असेही रोहित पवार म्हणाले.
पण ही कटकारस्थाने करणाऱ्या तसेच महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.
आदरणीय दादा,
खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात.… pic.twitter.com/FoNOfVvwD5
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 14, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List