पुण्यात भाजपच्या माजी नगरसेवकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, मारहाण केल्याचाही आरोप

पुण्यात भाजपच्या माजी नगरसेवकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, मारहाण केल्याचाही आरोप

पुण्यात भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शिळीमकर यांनी आपल्यासा मारहाण केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चेतन आरडे हे 20 जून रोजी पुण्यातल्या शंकरबाबा महाराज मठात माजी नगरसेवक महेश वाबळे यांच्यासोबत दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी मठात रुद्राभिषेक सुरू होता. चेतन आरडे जेव्हा पूजेच्या ठिकाणी गेले तेव्हा आरडे आणि शिळीमकर यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. शिळीमकर यांनी आपल्याला मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळ केली असा आरोप चेतन आरडे यांनी केला.

चेतन आरडे यांनी भाजपचे माजी नगरसेवक शिळीमकर यांच्याविरोधात पोलिसांत धाव घेतली. तसेच त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीवरून शिळीमकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;