‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’च्या कथानकात मोठा ट्विस्ट; नेत्राच्या आयुष्यात नव्या राक्षसाची एण्ट्री
झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. नेत्राने विरोचकाचा वध केला आहे. त्यानंतर ती तिच्या जुळ्या मुलींना सोबत घेऊन पुढचं आयुष्य जगायला सुरुवात करते.
नेत्राला जाणवू आणि दिसू लागतं की जुळ्या मुलींचे स्वभाव मात्र एकमेकींविरुद्ध आहेत. जिथे ईशा देवाशी निगडीत असलेल्या गोष्टींना स्वीकारते. पण रिमाला मात्र देवांच्या संदर्भातील एकही गोष्ट आवडत नाही.
अशीच काहीशी गोष्ट कोलकातामधे घडते. जिथे एका उत्खननात शतग्रीव नामक असूराचा शिलालेख सापडतो. त्या शिलालेखाचं वाचन करताच एक शक्ती जागी होते आणि ती शक्ती पश्चिम बंगालच्या दिशेने प्रवास करताना दिसते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List