गर्भधारणांसाठी अंडाशय देणारी महिला आई असल्याचा दावा करू शकत नाही! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

गर्भधारणांसाठी अंडाशय देणारी महिला आई असल्याचा दावा करू शकत नाही! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

गर्भधारणेसाठी अंडाशय देणारी महिला बाळाची आई असल्याचा दावा करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. स्पर्म, एग डोनरला पालकत्वाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

गर्भधारणा होत नसलेल्या बहिणीला दुसऱ्या बहिणीने अंडाशय दिले. आयव्हीएफद्वारे गर्भधारणा झाली. जुळ्या मुलींचा जन्म झाला. या मुलींची खरी आई मीच आहे, असा दावा अंडाशय देणाऱ्या बहिणीने केला. नऊ महिने गर्भ सांभाळणाऱ्या बहिणाला मुलींना भेटू दिले जात नव्हते. दरम्यान, ही याचिका मंजूर करत न्या. मिलिंद जाधव यांच्या एकल पीठाने स्थानिक न्यायालयाचे आदेश रद्द करत जुळ्या मुलींना भेटण्याची मुभा दिली.

मुलांसमोर भांडण करू नका

मुली आता पाच वर्षांच्या आहेत. या प्रकरणात त्यांचेही हित बघायला हवे. नऊ महिने गर्भात सांभाळ करणाऱ्या आईला मुलींना भेटू देण्याचे आदेश आम्ही देत आहोत. मात्र या भेटीत कोणताही वाद करू नका, असेही न्यायालयाने बजावले.

काय आहे प्रकरण

नवी मुंबईतील या जोडप्याचा 2012मध्ये विवाह झाला. पत्नीला गर्भधारणा होत नव्हती. अखेर पत्नीच्या बहिणीने तिला अंडाशय दिले. अंडाशय देणाऱ्या बहिणीच्या पती व मुलीचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे ती या जोडप्यासोबत राहत होती. परिणामी जोडप्यामध्ये वाद होऊ लागला. पती दोन मुलींना घेऊन वेगळा राहू लागला. पत्नीला मुलींना भेटू दिले जात नव्हते.

जेनेटीक आई असली तरी कायदेशीर अधिकार नाही

अंडाशय देताना दोन बहिणींमध्ये सरोगसीचा करार झाला होता. एका बहिणीने दुसऱ्या बहिणीला केवळ अंडकोष दिले. अंडकोष  देणारी बहीण जुळ्या मुलींची जेनेटीक आई होऊ शकते. पण बायोलॉजिकल मदर होऊ शकत नाही. पालकत्त्वाचा कोणाताही अधिकार तिला नाही. नियमांतही तशी तरतूद नाही, असे न्या. जाधव यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;