निवासी डॉक्टरांच्या संपामुळे राज्यात  रुग्णसेवा विस्कळीत, मुंबईतही ओपीडीत लांबच लांब रांगा

निवासी डॉक्टरांच्या संपामुळे राज्यात  रुग्णसेवा विस्कळीत, मुंबईतही ओपीडीत लांबच लांब रांगा

कोलकात्याच्या आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर विद्यार्थिनीवर झालेला अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभरात ‘मार्ड’ संघटनेच्या नेतृत्वाखाली निवासी डॉक्टरांकडून जोरदार आंदोलन केले. ओपीडीत रांगा लागल्याने रुग्णांची तासन्तास रखडपट्टी झाली. मात्र रुग्णालयांचे प्राध्यापक आणि बंधपत्रित डॉक्टरांमुळे रुग्णांना काहीसा दिलासा मिळाला.

कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे प्रतिसाद देशभर उमटले. याचा निषेध करीत ‘मार्ड’ने संपही पुकारला असून न्यायाची मागणी होत आहे. मात्र संपामुळे मुंबईसह राज्यातील रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. केईएमच्या त्वचारोग विभागाची ओपीडी दर दिवशी सकाळी 8 ते 12 च्या दरम्यान संपते. कारण, एरवी 12 निवासी डॉक्टर्स ओपीडीला असतात. संपामुळे फक्त 4 डॉक्टर्स ओपीडीला हजर होते. ज्यामुळे, रुग्णांना जवळपास एक ते दीड तास प्रतीक्षेत थांबावे लागले.

शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

दरम्यान, संप सुरू असेपर्यंत सर्व वरिष्ठ डॉक्टर्स काम करतील. बॉण्डेड, प्राध्यापक यांच्याकडून ओपीडी हाताळण्यात आली. सुरक्षारक्षकांचीही बैठक घेण्यात आली. ऑन कॉल डॉक्टरांसाठी रुम्सचीही सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

केईएम रुग्णालयात दर दिवशी किमान दीड ते दोन हजार नवीन रुग्ण ओपीडीत येतात. ही संख्या मंगळवारी 1288 वर होती, तर रुग्णालयात 38 मोठय़ा शस्त्रक्रिया आणि 62 छोट्या शस्त्रक्रिया केल्या, तर काही इलेक्टिव्ह शस्त्रक्रिया रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या.

संपामुळे राज्यभरातील हजारो अनावश्यक शस्त्रक्रिया थांबवाव्या लागल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या नायर, सायन, कूपर, केईएम आदी रुग्णालयांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक शस्त्रक्रिया थांबवाव्या लागल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;