‘बिग बॉस मराठी’त मोठा ट्विस्ट; दोन स्पर्धकांना मिळणार 5 ‘पॉवरकार्ड’ची पॉवर

‘बिग बॉस मराठी’त मोठा ट्विस्ट; दोन स्पर्धकांना मिळणार 5 ‘पॉवरकार्ड’ची पॉवर

‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या सिझनबाबत प्रेक्षकांमध्ये सध्या प्रचंड उत्सुकता आहे. आता या खेळात नवनवे ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. अभिजीत आणि अरबाजला मिळणार 5 पॉवरकार्डची पॉवर मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. सर्वच सदस्यांची खेळी ‘बिग बॉस’ प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. घरातील सदस्यांचं मनोरंजन, टास्क, भावना आणि ट्विस्टने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज अभिजीत सावंत आणि अरबाज पटेलला पाच पॉवरकार्ड मिळणार आहे.

कुणी केला ‘पॉवरकार्ड्स’चा वापर?

विकेंडला अभिजीत आणि अरबाजने ‘बिग बॉस मराठी’ चं तंटाघर चांगलच गाजवलं. अरबाज आणि अभिजीतने सेफ होण्यासाठी ‘पॉवरकार्ड्स’चा वापर केला आहे. आजच्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत, ‘अरबाज आणि अभिजीत आपल्यासमोर आहेत पाच पॉवरकार्ड्स’. त्यावर अभिजीत म्हणतोय,’बिग बॉस’ मी सेफसाठी पॉवरकार्डचा वापर करतोय’. तर अरबाजही म्हणतो की,’बिग बॉस’ मी सेफसाठी पॉवरकार्ड वापरतोय’. बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी या दोघांनी ‘पॉवरकार्ड्स’ वापर केला आहे. निक्की तांबोळीला मात्र हा निर्णय पटलेला नाही. अरबाजच्या या निर्णयावर निक्की म्हणते, की ‘ हा अतिशय चुकीचा निर्णय आहे.’ त्यामुळे अरबाजने घेतलेला निर्णय एकंदरीतच निक्कीला पटलेला नाही, असं दिसतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘बिग बॉस मराठी’च्या घरात मैफिल

‘बिग बॉस मराठी’च्या सतत वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसतात. आता ‘बिग बॉस मराठी’ च्या बाथरुममध्ये मैफिल रंगणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात धनंजय पोवार आणि अभिजीत सावंत ‘दिवाना है देखो’ हे गाणं म्हणताना दिसणार आहेत. या गाण्यावर सूरज आणि इरिना थिरकताना दिसणार आहेत.

निक्की आणि आर्यामध्ये वाद

निक्की तांबोळी आणि आर्या जाधव या दोघींमध्ये बिग बॉसच्या घरात वाद झाला आहे. आर्या निक्कीला सांगते की मला काही गोष्टींशी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी तिथून निघून आले. त्यावर निक्की आर्याला सांगते की आता मग इथून पुढे जर काही असेल, एखादा टास्क असेल तर मला त्याबद्दल विचारायचं नाहीस. कोणती लिपस्टिक लावू आणि कोणते झुमके घालू म्हणून मला विचारू नकोस, असं निक्की आर्याला सांगते. या दोघींमध्ये वाद झाल्याचं समोर आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;