Nagar News – निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस दलात खांदेपालट, 38 पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या

Nagar News – निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस दलात खांदेपालट, 38 पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नगरमध्ये 38 पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बदलीचा आदेश बजावला आहे.

पोलीस अधिकारी यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यासाठी तसेच जिल्ह्यात सद्यस्थितीत रिक्त असलेल्या ठिकाणी अधिकार्‍यांची नेमणूक करण्याकरीता जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यावर चर्चा करण्यात आली.

पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांची नियंत्रण कक्ष येथून शेवगाव पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांची शेवगाव येथून घारगांव पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांची घारगांव येथून जिल्हा विशेष शाखा, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची संगमनेर शहर पोलीस ठाणे येथून कोपरगाव शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांची जिल्हा विशेष शाखा येथून संगमनेर शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांची भरोस सेल येथून जिल्हा विशेष शाखा, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथून वाहतूक नियंत्रक शाखा शिर्डी, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांची वाहतूक नियंत्रक शाखा शिर्डी येथून एएचटीयू अहमदनगर येथे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची एएचटीयू अहमदनगर येथून वाचक पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस निरीक्षक मोरेश्‍वर पेंदाम यांची शहर वाहतूक नियंत्रक शाखा येथून सायबर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांची जिल्हा विशेष शाखा येथून शहर वाहतूक नियंत्रक शाखा नगर, पोलीस निरीक्षक नितीनकुमार चव्हाण यांची वाचक पोलीस अधीक्षक कार्यालय येथून आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांची नियंत्रण कक्ष येथून अकोले पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची नियंत्रण कक्ष येथून श्रीगोंदा पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले यांची श्रीगोंदा पोलीस ठाणे येथून नियंत्रण कक्ष सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांची पाथर्डी पोलीस ठाणे येथून भिंगार कॅम्प, सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांची भिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथून नियंत्रण कक्ष सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांची सोनई पोलीस ठाणे येथून कोपरगाव शहर, सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांची कर्जत येथून सोनई पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांची नियंत्रण कक्ष येथून अर्ज शाखा, नव्याने हजर झालेले सहायक पोलीस निरीक्षक समीझ हजरत मुलानी यांची कर्जत पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.

जळगाव येथून बदलीने आलेले सहायक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला यांची जामखेड पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांची टीएमसी, वाचक अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अकार्यकारीपदावर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप हजारे यांची शिर्डी पोलीस ठाणे येथून वाहतूक नियंत्रण शाखा अकार्यकारी पदावर, सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांची नियंत्रण कक्ष येथून वाचक कार्यालय संगमनेर उपविभाग अकार्यकारी पद, उपनिरीक्षक शुभांगी मोरे यांची भिंगार पोलीस स्टेशन येथून लोणी, उपनिरीक्षक योगेश शिंदे यांची लोणी पोलीस स्टेशन येथून भिंगार पोलीस स्टेशन, उपनिरीक्षक तुळशीराम पवार यांची नियंत्रण कक्ष येथून बेलवंडी पोलीस ठाणे, उपनिरीक्षक प्रियांका आठरे यांची एएचटीयू येथून भरोसा सेल अकार्यकारीपदावर, उपनिरीक्षक निवांत जाधव यांची नक्षल सेल येथून व्हीआयपी प्रोटोकॉल शनिशिंगणापूर मंदिर अकार्यकारीपदावर, उपनिरीक्षक उमेश पतंगे यांची नियंत्रण कक्ष ते टीएमसी अहमदनगर येथे बदली करण्यात आली आहे.

नाशिक ग्रामीण येथून बदलीने आलेले उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांना वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नगर शहर, उपनिरीक्षक दीपक पाठक यांना वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शेवगाव अकार्यकारीपदावर, उपनिरीक्षक सतीश डौले यांना वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय श्रीरामपूर अकार्यकारीपदावर, योगेश चाहेर यांना सायबर पोलीस ठाणे अकार्यकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांना प्रभारी अधिकारी दहशतवाद विरोधी शाखा, उपनिरीक्षक उमेश पतंगे यांना प्रभारी अधिकारी बीडीडीएस, उपनिरीक्षक महेश शिंदे यांना प्रभारी अधिकारी नक्षल सेल या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश येईपर्यंत सोपवण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;