महायुतीच्या नेत्यांच्या घशात टेंडरचा पैसा; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

महायुतीच्या नेत्यांच्या घशात टेंडरचा पैसा; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजाच्या विकासासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल सरकारला आदर नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काम सुरू नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पूर्ण झाले नाही. यावरून महायुती सरकारला बहुजनांच्या प्रतिकांबद्दल आस्था नाही हे आता स्पष्ट आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांची देखील या सरकारला काळजी नाही. यंदाचा स्वातंत्र्य दिन हा शालेय विद्यार्थ्यांचा गणवेशाशिवाय होणार आहे. शाळा जून महिन्यात सुरू होऊन ऑगस्ट महिना उजाडला तरी अजून गणवेश मिळालेला नाही.टक्केवारीसाठी आणलेली महायुतीची गणवेश योजना देखील फसली आहे. अशी प्रतिक्रीया देत राज्य सरकारच्या कारभारावर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुलढाणा येथे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात भ्रष्टाचार शिगेला गेला आहे. बुलढाणामध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली पैसे घेऊन मोठे फार्म हाऊस बांधले जातात त्यासाठी दुसऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जातात यासारखे दुर्देव नाही. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिण योजना आणली. नंतर बहिणींची मत विकत घेतल्याच्या अविर्भावात महायुतीचे नेते वावरत आहेत. त्यांचाबद्दल अपमानास्पद भाषा वापरली जात आहे. हेच या सरकारचे खरे रूप आहे. सत्ताधारी आमदार बहिणींचा अपमान करत आहे. सरकार माफी मागत नाही. त्यामुळे या सरकारला जनता धडा शिकवेल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;