जालन्यातील वरुड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍याने दिला चोप

जालन्यातील वरुड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍याने दिला चोप

जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील वरूड बु. येथे बँकेत येणार्‍या शेतकर्‍यांना विनाकारण त्रास देणार्‍या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकाला आज 13 ऑगस्ट रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मयुर बोर्डे यांनी बँकेत घुसून चोप दिला. वरुड परिसरात प्रचंड खळबळ माजली होती.

गेले काही महिन्यात बँकेत येणार्‍या शेतकर्‍यांना विनाकारण त्रास देत अडवणूक केली जात होती. अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मयुर बोर्डे यांच्याकडे अनेक शेतकर्‍यांनी केल्यानंतर आज 13 ऑगस्ट रोजी मयुर बोर्डे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने बँक ऑफ महाराष्ट्र वरूड शाखेत येथे पोहचले. पिक कर्ज कधी भरणार, केव्हा भरणार, अशी लेखी लिहून द्या यासह अनेक कारणांसाठी अडवणूक करून, निराधार, वयोवृध्द, विधवा, दुधाचे अनुदान, घरकुलाचे अनुदान असे अनेक पेमेंट बँकेत जमा झालेल्या पैशाला व्यवस्थापकाने हॉल्ड लाऊन ठेवले होते. अनेकांना घरगुती अडचणीचा सामना करतांना दवाखान्या,मुलांचे शिक्षण या सारख्या महत्वाच्या कामासाठी पैसे हवे होते. मात्र ते पैसे काढता येत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. यावर जाब विचारण्यासाठी मयुर बोर्डे यांनी बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापकाला सदरील अडचणीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. शेतकरी अडचणीत असताना व्यवस्थापक सहकार्य करत नसल्याचे लक्षात आल्याने शेतकरी संघटनेचे मयूर बोर्डे यांनी शाखा व्यवस्थापकाला चोप दिला. तर यापुढे शेतकर्‍यांची पुन्हा अडवणूक केल्यास, सोडणार नाही असा इशारा मयुर बोर्डे यांनी व्यवस्थापकासह बँक कर्मचार्‍यांना या वेळी इशारा दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;