आम्हाला आरक्षण नाही मिळाले तर यांना आम्ही पाडणार, जरांगे पाटील यांचा इशारा

आम्हाला आरक्षण नाही मिळाले तर यांना आम्ही पाडणार, जरांगे पाटील यांचा इशारा

हे सरकार मराठा द्वेष्टा आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच आम्हाला आरक्षण नाही मिळाले तर यांना आम्ही पाडणार असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.

काल नगर येथे शांतता यात्रा झाल्यानंतर आज शिर्डी या ठिकाणी मनोज जरांगे यांनी साईबाबांचे दर्शन घेतले त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मी प्रामाणिकपणे काम करत आहे. आरक्षण देणं माझ्या हातात नाही. मी फक्त समाजासाठी न्याय मागत आहे. रिंगणामध्ये मी उतरलेलो आहे आपण प्रयत्न केले पाहिजे ही भूमिका घेऊन मी एक महिन्यापासून आंदोलन सुरू केलेल्या आहे. यश देणं हे सरकारच्या हातात आहे जर या सरकारने ते दिलं नाही तर निश्चितपणे जनता त्यांना धडा शिकवेल. मात्र राज्यातील सरकार हे मराठवाडा दुष्ट सरकार आहे असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला.

केंद्र सरकारकडे आता आम्हाला या विषयासाठी पाठवायचं का असा सवाल करत पुन्हा एकदा पाच दहा वर्ष जाणार आमची एकच मागणी आहे, ओबीसीतील आम्हाला आरक्षण मिळावे मराठा व कुणबी हे एकच आहे. आमचा केंद्राचा काही संबंध नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. आरक्षण देताना आम्हाला कशा पद्धतीने या अगोदर दिलं गेलं, 16% मध्ये काय काय होते, नंतर उपजाती कशा पद्धतीने घातल्या गेल्या, हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे याच्या मागे कोण आहे हे सांगायची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावत मराठी व कुणबी एकच असल्यामुळे कुणबी जात होत नाही का असा सवाल त्यांनी विचारला.

मंत्री भुजबळ यांना मराठा आरक्षणामध्ये भांडणे लावायला ठेवला आहे असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. तसेच आंतरवाली मध्ये त्यांनी अशाच पद्धतीचे उद्योग केले आहेत, माझ्या गावांमध्ये यांनी मिरवणूक काढली, एवढेच नाही तर तिथे रात्री लोक पाठवून लोकांवर दगडफेक केली गोरगरिबांचे नुकसान केले वास्तविक पाहता पोलीस प्रशासनावरच दरोड्याचे गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.

त्यांचा कार्यक्रम लावणार

आज राज्यामध्ये जे मराठा आमदार आहेत तेच मराठ्यांच्या विरोधामध्ये बोलतात त्यांचा या वेळेला जनता कार्यक्रम लावणारच अशा शब्दात जरांगे यांनी त्या आमदारांचा समाचार घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;