Doctor Strike – मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील शेकडो डॉक्टर संपावर; रुग्णांना फटका

Doctor Strike – मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील शेकडो डॉक्टर संपावर; रुग्णांना फटका

कोलकातामध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याने या घटनेच्या निषेधार्थ फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने ( FAIMA )  देशात ओपीडी सेवा बंद करण्याची हाक दिली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. तर मुबंई, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यातील शेकडो डॉक्टर संपावर गेले आहेत. याचा फटका रुग्णांना बसला आहे.

कोलकाता बलात्कार प्रकरणात केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा. आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी निवासी डॉक्टर करत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

फेडरेशन ऑफ ऑल इंडियन मेडिकल असोसिएशनने ( FAIMA ) ओपीडी सेवा देशव्यापी बंद करण्याची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुंबईतील नायर रुग्णालय, जेजे रुग्णालय, केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले आहे. तर नागपुरातील शासकीय मेयो आणि मेडीकल या दोन रुग्णालयाचे डॉक्टर आजपासून संपावर आहेत.

घाटीत डॉक्टरांचा संप

छत्रपती संभाजीनगरात सोमवारी कँडल मार्च काढण्यात आल्यानंतर आज डाॅक्टरांनी संप पुकराला आहे. यावेळी ‘वी वाँट जस्टीस’च्या घोषणांनी रुग्णालय अपघात विभाग दणाणला. कोलकाता येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर निवासी डाॅक्टरांनी संप पुकराला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्वच विभागाचे डॉक्टर संपात सहभागी झाल्याची माहिती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डाॅ. रोहन गायकवाड यांनी दिली. या घटनेचा निषेध आणि मृत डाॅक्टर तरुणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे इंटर्न आणि निवासी डाॅक्टरांची मार्ड संघटना व असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न (अस्मि) संघटनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;