बांगलादेशातील हिंसाचाराचा संत्रा उत्पादकांना फटका; विदर्भातील निर्यातीवर लागला ब्रेक

बांगलादेशातील हिंसाचाराचा संत्रा उत्पादकांना फटका; विदर्भातील निर्यातीवर लागला ब्रेक

महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वात मोठे संत्रा उत्पादक क्षेत्र नागपुरात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन केले जाते. बांगलादेशातून या संत्र्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. पण बांगलादेशातील हिंसाचारामुळे संत्र्यांची निर्यात पूर्णपणे रखडली आहे. त्यामुळे दर हंगामात बांगलादेशात होणाऱ्या अडीच टन संत्र्यांच्या निर्यातीला फटका बसला असून शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे.

बांगलादेशातील परिस्थीती अजूनही जैसे थे आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे हिंसाचार उफाळून आला होता. मात्र या परिस्थितीमुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. गेल्या काही वर्षांत बांगलादेशाने हिंदुस्थानातून येणाऱ्या संत्र्यांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावले होते. मात्र तरीही बांगलादेशातील संत्र्यांची मागणी कमी झाली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून संत्रा उत्पादनात वाढ केली. जेणेकरून यावर्षी देखील संत्र्याचा दुप्पट प्रमाणात खप होईल. पण आता बांगलादेशातील अराजक स्थितीमुळे एकही व्यापारी बांगलादेशात संत्रा घेऊन जायला तयार नाही.

कोणताही व्यापारी बांगलादेशात जाण्यास तयार नसेल तर बांगलादेशला निर्यात होणाऱ्या अडीच लाख टन संत्र्याचं यंदा करायचं काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात संत्रा बाजारात येण्यास सुरुवात होईल. शेतकऱ्यांनाही चांगल्या उत्पन्नाची आस आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ शोधण्यास मदत करावी, अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;