Maharashtra Assembly Election – नोव्हेंबरमध्ये लागणार विधानसभेचा निकाल? दिवाळीनंतर होणार मतदान?

Maharashtra Assembly Election – नोव्हेंबरमध्ये लागणार विधानसभेचा निकाल? दिवाळीनंतर होणार मतदान?

लोकसभा निवडणूक झाली असून राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. पण निवडणूक कधी होणार हे अजून कळालेले नाही. दिवाळीपूर्वीच निवडणूक होणार की दिवाळीनंतर राज्यात नवे सरकार स्थापन होणार यावर अनेक अंदाज बांधले जात आहे.

महाराष्ट्राच्या सरकारचा कार्यकाळ 27 नोव्हेंबरला संपतोय. त्यामुळे 27 नोव्हेंबरपुर्वी राज्यात नवीन सरकार स्थापन होणे अपेक्षित आहे.राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर 45 दिवसांनी नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता असते. निवडणूक आयोगाने जर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान घ्यायचे ठरवले तर 12 ऑक्टोबरला राज्यातील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 45 दिवस लागले तर 27 नोव्हेंबरपर्यंत राज्याला नवीन सरकार मिळू शकते.

ऑक्टोबरमध्ये निवडणूक?

ऑक्टोबरमध्ये निवडणूक होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण त्यासाठी सप्टेंबरमध्येच निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागेल. पण अजूनही पावसाचा हंगाम संपलेला नाही, आणि निवडणूक आयोगाकडून तशा हालचाली दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये राज्याची निवडणूक होणार नाही असेही सांगितले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;