टॉकीजच्या जागी आता उभा राहणार हायफाय मॉल ;ठाणेकरांच्या मनोरंजनाचे ‘अशोक’ पर्व संपले

टॉकीजच्या जागी आता उभा राहणार हायफाय मॉल ;ठाणेकरांच्या मनोरंजनाचे ‘अशोक’ पर्व संपले

ठाणे स्टेशनला पश्चिमेला उतरले की पहिले दर्शन ‘त्याचे’ व्हायचे… जेव्हा ब्लॅक अॅण्ड व्हाईटचा जमाना होता आणि मनोरंजनाची फारशी साधनेच नव्हती तेव्हा ७०-८० च्या दशकात ठाणेकरांसाठी या वास्तूने ठाणेकरांना रिझवले, हसवले आणि रडवलेही… कधी काळी या वास्तूने हाऊसफुल्लचे बोर्डही पाहिले. सुपरहिट सिनेमे पाहण्यासाठी ब्लॅकने तिकिटे काढून झुंबडीने येणारे प्रेक्षकही पाहिले. स्मार्टफोनचा जमाना आला आणि या वास्तूला घर घर लागली. एकेकाळी तुफान गर्दी होणाऱ्या या वास्तूकडे रसिक प्रेक्षक फिरकेनासे झाले. अखेर आज या वास्तूवर पहिला हातोडा पडला… होय, ठाणेकरांचे मनोरंजन करणारे पहिले थिएटर अशोक टॉकीज आजपासून जमीनदोस्त व्हायला सुरुवात झाली आणि ठाणेकरांचे मनोरंजनाचे ‘अशोक’ पर्व संपले. या टॉकीजवर हातोडा पडताना ठाणेकर हळहळत होते.. आता इथे उभा राहणार हायफाय मॉल.

हाऊसफुल्ल सिनेमे
या चित्रपटगृहात दादा कोंडके यांचे ह्योच नवरा पाहिजे, आंधळा मारतो डोळा, एकटा जीव सदाशिव, राम राम गंगाराम, आली अंगावर यासारख्या अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले, तर अमिताभ बच्चन यांचे शोले, कालिया, शराबी, सिलसिला यासारख्या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स
ऑफिसवर धमाका केला.

मॉर्निंग शोसाठी झुंबड
अशोक टॉकीज हे एकमेव टॉकीज ठाण्यात असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मॉर्निंग शो बघण्यासाठी झुंबड उडायची. तसेच हे टॉकीज स्टेशन परिसरात असल्याने कोणाची एसटी, ट्रेन चुकली किंवा उशिरा असेल तर संपूर्ण कुटुंब वेळ घालविण्यासाठी चित्रपट बघण्याचा आनंद घेत असत.

ठाणे एसटी डेपोला लागूनच गेल्या ५५ वर्षांपासून अशोक टॉकीज दिमाखात उभी होती. जवळपास ठाणेकरांच्या पाच पिढ्यांचे मनोरंजन या टॉकीजने केले. ठाण्यातले पहिले थिएटर असे बिरुद या अशोक टॉकीजने मिरवले. मोजक्या घरात असलेले ब्लॅक अॅण्ड व्हाइट टीव्ही आणि भिंतीवर लटकलेले रेडिओ या पलीकडे मनोरंजनाची कोणतीही साधने नव्हती तेव्हा सिनेमे पाहण्यासाठी अशोक टॉकीजमध्ये तुफान गर्दी व्हायची. मॉर्निंग, मॅटिनी आणि रेग्यूलर असे पाच शो लागायचे. दोन रुपये, पाच रुपये असे तिकीट काढून येणाऱ्या ठाणेकरांमुळे थिएटरमधील साडेचारशे आसने फुल्ल व्हायची. या थिएटरची बाल्कनीही रसिकांचे आकर्षण होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;