खासदारकीमुळे काय नुकसान होतय? त्यावर कंगना रनौत पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलल्या

खासदारकीमुळे काय नुकसान होतय? त्यावर कंगना रनौत पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलल्या

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आता फक्त अभिनेत्री राहिलेल्या नाहीत, राजकारणात देखील त्यांनी स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. हिमाचल येथील मंडी मतदार संघातून कंगना खासदार म्हणून निवडून आल्या आहे. त्यामुळे कंगना यांना आता सिनेमा आणि राजकारण यांच्यामध्ये वेळ मॅनेज करणं प्रचंड कठीण झालं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी खासदार झाल्यानंतर समोर येणाऱ्या आव्हानांबद्दल मोठा खुलासा केला नाही. खासदार होणं हे खूप मागणीचं काम आहे… असं देखील कंगना म्हणाल्या.

खऱ्या आयुष्यात अभिनेत्री आणि खासदार अशा दोन्ही भूमिका साकारणाऱ्या कंगना रनौत म्हणाल्या, ‘एक खासदार असणं फार मागणीचं काम आहे. विशेषतः माझ्या मतदारसंघात. कारण आमच्या येथे आता पूर आला आहे. त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे. हिमाचल जाऊन पाहायचं आहे की सर्व काही नियंत्रणात आहे की नाही…’

कंगाना यांच्या मतदार संघात आलेल्या पुरामुळे अभिनेत्रीचं वेळापत्रक आणखी व्यस्त झालं आहे. कंगना यांनी चित्रपटसृष्टीतील वचनबद्धतेसह खासदार म्हणून स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. अभिनेत्रीच्या राजकीय कारकिर्दीचा सिनेमांवर झालेला परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे आगामी सिनेमांवर परिणाम होत आहे… असं देखील कंगना म्हणाल्या.

कंगना रनौत पुढे म्हणाल्या, ‘माझ्या आगामी सिनेमांवर प्रभाव पडत आहे. पुढील प्रोजेक्ट्स प्रतीक्षेत आहेत. मी शुटिंग सुरु करत नाहीये. आता सध्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत आहेत..’ सांगायचं झालं तर, कंगना रनौत स्टारर ‘तनू वेड्स मनू’ सिनेमाच्या तिसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत. सिनेमाच्या दोन्ही भागांमध्ये कंगना यांनी दमदार भूमिका साकारली होती.

सिनेमाते दिग्दर्शक आनंद एल राय यांनी ‘तनू वेड्स मनू’ सिनेमाच्या तिसऱ्या भागाबद्दल मोठी अपडेट दिली होती. ‘तिसऱ्या भागाची कथा अद्याप ठरलेली नाही. तनू वेड्स मनू रिटर्न्समध्ये दत्तो नावाची भूमिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या सर्व भूमिका तिसऱ्या भागाची मागणी करत आहेत. चांगली कथा हाती लागल्यानंतर नक्की तिसऱ्या भागाचा विचार करु…’ असं देखील दिग्दर्शक म्हणाले.

कंगना रनौत स्टारर ‘इमरजेन्सी’ सिनेमा

कंगना रनौत स्टाकक ‘इमरजेन्सी’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर 14 ऑगस्ट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमा 6 सप्टेंबर 2024 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात दिवंगत अभिनेते सतीश कौशिक मुख्य भूमिकेत आहेत. तर श्रेयस तळपदे, महिमा चौधरी यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;