सातारा-लोणंद रस्त्यावर दोन ट्रकची टक्कर; दोन ठार

सातारा-लोणंद रस्त्यावर दोन ट्रकची टक्कर; दोन ठार

सातारा-लोणंद रस्त्यावर अंबवडे सं. वाघोली गावानजीक आज पहाटे दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघात दोन ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्याने चालकाचा गाडीतच जळून मृत्यू झाल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

अल्ताफ मन्सुरी (वय 20, रा. भगोरा, ता. जिरापूर, जि. राजगड, मध्य प्रदेश) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. दुसरा चालक महेश दयानंद घुगे (वय 37, रा. गोकुळ शिरगाव, कोल्हापूर) याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. जखमी क्लीनर मांगीलाल रामप्रसाद भोल (रा. स्वायादीपपुरा, जि. आगरमालवा (मध्य प्रदेश), उदय आबाजी पाटील ( रा. कन्हेरी मठ, कोल्हापूर) यांच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

लोणंद बाजूकडून कडप्पा फरशी भरलेला ट्रक सातारच्या दिशेने चालला होता, तर आयशर मालट्रक सातारा बाजूकडून लोणंदच्या दिशेने निघाला होता. आंबवडे चौक ते पिंपोडे खुर्द गावांदरम्यान दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. त्यामध्ये कडप्पा भरलेल्या ट्रकचा चालक अल्ताफ मन्सुरी हा जखमी अवस्थेत आत अडकला होता. अपघातानंतर ट्रकने पेट घेतला. त्या स्थितीतही ट्रकचा जखमी क्लीनर मांगीलाल रामप्रसाद भोल याने जखमी चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अपयश आले. मांगीलालच्या डोळ्यांसमोर चालकाचा गाडीच्या आगीत जळून मृत्यू झाला.

आयशर ट्रकच्याही केबिनचा चक्काचूर झाला असून, चालक महेश दयानंद घुगे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला वाठार स्टेशन पोलिसांनी उपचारांसाठी सातारा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वाठार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;