सुशांत सिंह राजपूतच्या घरात राहण्याचं अदा शर्माने सांगितलं कारण, रेंटबद्दलही अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

सुशांत सिंह राजपूतच्या घरात राहण्याचं अदा शर्माने सांगितलं कारण, रेंटबद्दलही अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

अभिनेत्री अदा शर्मा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर अदा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या घरात राहायला गेली त्यामुळे चर्चेत आली. ऑक्टोबर 2023 मध्ये अदाने अपार्टमेंट लीजवर घेतला आहे. वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्री आई आणि आजीसोबत अपार्टमेंटमध्ये राहायला गेली. नुकताच झालेल्या एका पत्रकार परिषदेत अभिनेत्रीने घराबद्दल मोठी खुलासा केला आहे. शिवाय घरासाठी महिन्याला द्यावं लागणाऱ्या भाड्याबद्दल देखील अदा शर्मा व्यक्त झाली आहे.

सुशांत सिंह राजपूत याच्या घरात राहाण्याचं कारण सांगत अदा म्हणाली, ‘मी जे घर घेतलं आहे, ते भाडेतत्वावर घेतलं आहे. केरळ स्टोरी सिनेमातून मिळालेले 300 कोटी माझे नाही. मी भाड्याने राहात आहे. पण घराचं भाडं फक्त मी एकटी नाही भरत तर, माझी आजीचं देखील योगदान आहे. आजी मला मदद करते. मी घरात राहाते त्यामुळे मला देखील योगदान द्यायला हवं…’

‘माझी आई आर्थिक योगदान देत नाही, पण संपूर्ण घर ती सांभाळते. सांगायचं झालं तर, ज्या घरात मी राहाते ते घर माझं नाही. ते घर श्री लालवानी यांचं आहे. ते सध्या दक्षिण अफ्रिकेत राहातात. सुशांत देखील भाड्याने राहायचा. माझं संपूर्ण आयुष्य वांद्रे येथील पाली हिलमध्ये गेलं…’

‘मी पहिल्यांदा माझं घर सोडून राहात आहे. मी व्हाईब्सबद्दल खूप संवेदनशील आहे आणि याठिकाणी मला सकारात्मक वाटतं. केरळ आणि मुंबईतील आमची घरे झाडांनी वेढलेली आहेत आणि आम्ही पक्ष्यांना खायला देतो. त्यामुळे मला याठिकाणी देखील असंच घर हवं होतं. घरात पक्ष्यांना खायला पुरेशी जागा हवी होती.. असं देखील अभिनेत्री म्हणाली.

अदा शर्मा हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘तुमको मेरी कसम’ सिनेमात दिसणार आहे. सिनेमातून इंदिरा आयव्हीएफचे संस्थापक डॉ अजय मुर्डिया यांचं संपूर्ण आयुष्या प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. सिनमात अदा शर्मा हिच्यासोबत इश्वाक सिंह आणि अभिनेते अनुपम खेर देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

अदा शर्मा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;