कुर्ला विधानसभा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कुर्ला विधानसभा विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
जाहीर झालेल्या नियुक्त्यांमध्ये विधानसभा संघटकपदी किसन मदने (शाखा क्र. 149, 151, 167, 168, 169, 170, 171), विधानसभा समन्वयक – बळीराम उतेकर (शाखा क्र. 149, 151, 169), मुकुंद चव्हाण (शाखा क्र. 167, 168), मोहन तावडे (शाखा क्र. 170, 171), उपविभागप्रमुख – सचिन उमरोटकर (शाखा क्र. 149, 151, 169), समीर हिरडेकर (शाखा क्र. 167, 168), अनंत गांधी (शाखा क्र. 170, 171), शाखाप्रमुख – विशाल बिलये (शाखा क्र. 149), पंढरीनाथ आंबेडकर (शाखा क्र. 151), फारुख गोलंदाज (शाखा क्र. 167), विशाल मांढरे (शाखा क्र. 168), प्रदीप चौघुले (शाखा क्र. 169), मलकितसिंग संधू (शाखा क्र. 170), प्रकाश साळुंके (शाखा क्र. 171) यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List