बुलढाणा अकोला वाशीम निवडणूक पूर्वतयारी काँग्रेसच्या आढावा बैठकीला उपस्थित रहा; राहुल बोंद्रे यांचे आवाहन

बुलढाणा अकोला वाशीम निवडणूक पूर्वतयारी काँग्रेसच्या आढावा बैठकीला उपस्थित रहा; राहुल बोंद्रे यांचे आवाहन

विधानसभा 2024 निवडणूकपूर्व तयारी कॉंग्रेच्या आढावा बैठक मंगळवारी (दिनांक 13 ऑगस्ट रोजी) सहकार विद्यामंदिर सभागृह बुलढाणा येथे आयोजन करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकपूर्व तयारी आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनात तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे.

यावेळी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधीपक्ष नेते विजयजी वडेट्टीवार, विधानपरिषद गटनेते सतेज पाटील या मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बुलढाणा अकोला व वाशीम जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीला बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे, असे आवाहन बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले आहे.

बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणूक पूर्वतयारीसाठी बुलढाणा अकोला व वाशीम जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिराचे सभागृहात 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बुलढाणा, अकोला, वाशीम जिल्हा कॉंग्रेस कमिटी यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 1 ते 2 दरम्यान भोजन अवकाश व त्यांनतर दुपारी 2 ते 3 वाशीम जिल्हा कॉंग्रेस कमिटी आढावा बैठक, दुपारी 3 ते 4 या वेळेत अकोला जिल्हा कॉंग्रेस कमिटी आढावा बैठक, सायंकाळी 4 ते 5 या वेळेत बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटी आढावा बैठक होणार आहे.

विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीला उपरोक्त बुलढाणा, अकोला, वाशीम या जिल्ह्यातील कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, आजी माजी खासदार, आमदार, कॉंग्रेस कमिटी सदस्य, प्रदेश प्रतिनिधी व पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, आघाडी संघटनेचे पदाधिकारी, विभाग व सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांचे सदस्य आदी मान्यवरांनी या महत्वपूर्ण बैठकीला मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;