25 महिलांना पाठवल्या पॉर्न क्लिप्स, विकृत व्यक्तीला मुंबई पोलिसांकडून अटक

25 महिलांना पाठवल्या पॉर्न क्लिप्स, विकृत व्यक्तीला मुंबई पोलिसांकडून अटक

एका विकृत व्यक्तीने 25 महिलांना अश्लील व्हिडीओ आणि पॉर्न क्लिप पाठवल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. मोहम्मद अझीझ निसार खान असे या आरोपीचे नाव आहे.

मोहम्मद खान हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून त्याचे लग्न झाले आहे. त्याला दोन मुलंही आहेत. मोहम्मद सध्या मुंबईच्या बेहरामपाड्यात रहायचा आणि पराठ्याचे दुकान चालवायचा.

एका 30 वर्षीय महिलेच्या मोबाईलवर फोन आला, आणि फोनवर ही व्यक्ती अश्लील संभाषण करत होती. जेव्हा या महिलेने फोन कट केला तेव्हा तिच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील व्हिडीओ आले. या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसानी ज्या मोबाईल नंबरवरून व्हिडीओ क्लिप आल्या त्याची माहिती काढली. तेव्हा हा नंबर मोहम्मद खानचा असल्याचे कळाले.

मोहम्मद खान अंदाजपंचे मोबाईलवर फोन नंबर डायल करायचा. जर समोरची व्यक्ती महिला असेल तर तो अश्लील संभाषण सुरू करायचा आणि नंतर त्याच व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर अश्लील व्हिडीओ आणि पॉर्न क्लिप पाठवायचा. या प्रकरणी पोलिसांनी खानला अटक केली असून पुढील तपास सुरू ठेवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;