Viral Video मनुची मम्मी भेटली नीरजला; नेटकऱ्यांच्या मनात वाजू लागले सनईचे चौघड्याचे सूर

Viral Video मनुची मम्मी भेटली नीरजला; नेटकऱ्यांच्या मनात वाजू लागले सनईचे चौघड्याचे सूर

Paris Olympic 2024 स्पर्धेची सोमवारी 11 ऑगस्ट रोजी सांगता झाली. या स्पर्धेत हिंदुस्थानने एकूण 6 पदके जिंकली असून यापैकी 5 कांस्य तर 1 रौप्यपदक आहे. दरम्यान या स्पर्धेत हिंदुस्थानचे पहिले पदक महिला नेमबाज मनू भाकरने जिंकले. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. तसेच नेमबाजीत देशाला तीन कांस्यपदके मिळाली आहेत. दरम्यान ऑलिम्पिकची स्पर्धा संपताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे मनू भाकरची आई निरज चोप्रासोबत गप्पा मारताना दिसत आहे. त्यामुळे आता वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे.

निरज चोप्रा आणि मनू भाकरची आई यांच्यातील संभाषणाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे दोघेही एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत. तसेच मनू भाकरची आई नीरज चोप्राचा हात आपल्या डोक्यावर ठेवताना दिसत आहे. बाहेर आवाज जास्त असल्याने दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे कळू शकलेलं नाही. नेटकऱ्यांनी मात्र या संभाषणाचा आपल्याला वाटेल तसा अंदाज लावला आहे. नेटकऱ्यांच्या मते नीरज चोप्राची आई मनू भाकरसोबत लग्नाची चर्चा करत असल्याचं दिसत आहे.

या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मनू भाकरची आई जावयाच्या शोधात असून लग्नाची चर्चा सुरू असल्याचं म्हटलं आहे. तर एका युजरने मग…ठरलं का?, लग्नाची सुपारी फोडायची का मग?, असंही म्हटलं आहे. तर एका युजरने यालाच तुमचा जावई बनवा काकू असा सल्ला दिला आहे.

रौप्य पदक जिंकल्यानंतर मनू भाकर आणि नीरज चोप्रा यांच्यात एक लहानसा संवाद झाला. याचा व्हिडीओ देखील आता व्हायरल होतोय. यावेळी मनू भाकरची आई दोघांचा एकत्र फोटो काढण्यासाठी पुढे येते. यावेळी मनू भाकर फोटो नको असं म्हणत पुढे जाते. या व्हिडीओवरूनही सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;