हा फॅमिलीसोबत बघता येणारा शो आहे का? पतीच्या पोस्टनंतर ‘बिग बॉस मराठी 5’ स्पर्धकाकडून शो सोडण्याची इच्छा व्यक्त

हा फॅमिलीसोबत बघता येणारा शो आहे का? पतीच्या पोस्टनंतर ‘बिग बॉस मराठी 5’ स्पर्धकाकडून शो सोडण्याची इच्छा व्यक्त

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. या सिझनचा दुसरा भाऊचा धक्का नुकताच पार पडला. यावेळी रितेश देशमुखने काही कलाकारांचं कौतुक केलं, तर काहींची चांगलीच शाळा घेतली. जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, वैभव, निक्की या सदस्यांना रितेशने सुनावलं. तर सूरज चव्हाण आणि योगिताच्या खेळीचं कौतुक केलं. यावेळी योगिताला अश्रू अनावर झाले. तिने रितेशसमोर थेट शो सोडण्याची इच्छा बोलून दाखवली. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत योगिताने भूमिका साकारली होती. याच मालिकेतील सहकलाकार सौरभ चौघुलेशी तिने पाच महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात जेव्हा कॅप्टन्सीचा टास्क पार पडला, तेव्हा योगिताच्या पतीने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट लिहिली होती.

सौरभने त्याच्या या पोस्टमध्ये बिग बॉसमधील काही स्पर्धकांच्या भाषेवर आक्षेप घेतला होता. ‘लायकी, भीक आणि घाणेरडी भाषा वापरली जाते. खरंच हा फॅमिलीसोबत बघता येणारा प्रोग्राम आहे का?’, असा सवाल त्याने केला होता. अभिजीत आणि अंकिताने कॅप्टन्सी टास्कच्या पहिल्याच फेरीत बाजी मारल्याने जान्हवी आणि अरबाज खूप संतापले होते. या दोघांनी इतर स्पर्धकांबद्दल अपशब्द वापरले होते. दुसरीकडे आर्याने निक्की आणि जान्हवीवर टास्कदरम्यान मारहाण केल्याचा आरोप केला होता. टास्कदरम्यान घरातील वातावरण प्रचंड तापलं होतं. विरोधी टीमने वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल वर्षा उसगांवकर यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली होती.

सौरभची पोस्ट-

आता भाऊच्या धक्क्यावर जेव्हा रितेशने योगिताचं कौतुक केलं, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. ती रडत रितेशला म्हणाली, “मला माहीत नाही की मी कशी खेळतेय? पण मला इथे नाही राहायचंय. माझी चूक झाली, मी इथे आले. मी इथे यायलाच नको होतं. मला हे सहन होत नाही. मी इथे नाही राहू शकत. मला घराबाहेर पडायचंय. मला हा खेळ सोडायचा आहे.” भावनेच्या भरात येऊन योगिता शो सोडण्याची इच्छा व्यक्त करते, तेव्हा रितेश तिला समजावतो. “इथे कोणी राहायचं आणि कोणी नाही, हे मी नाही ठरवू शकत. हे जनता आणि बिग बॉसच ठरवणार. तुम्हाला असं का वाटतंय माहीत नाही. पण तुम्ही चांगलं खेळताय”, असं तो योगिताला सांगतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;