10 वर्ष लिव्हइन मध्ये राहिल्यानंतर दुसऱ्याच मुलीशी करत होता लग्न, महिलेकडून तरुणावर अ‍ॅसिड हल्ला

10 वर्ष लिव्हइन मध्ये राहिल्यानंतर दुसऱ्याच मुलीशी करत होता लग्न, महिलेकडून तरुणावर अ‍ॅसिड हल्ला

एक महिला एका तरुणासोबत 10 वर्ष लिव्हइनमध्ये राहत होती. पण हा तरुणी दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न करणार होता. म्हणून रागाच्या भरात या महिलेने या तरुणावर अ‍ॅसिडने हल्ला केला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीत जया ही विधवा महिला आपल्या मुलासोबत राहत होती. जया तेव्हा 34 वर्षांची होती. तेव्हा तिची ओळख 22 वर्षीय तरुण शेख सय्यदशी झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पण दोघांनी लग्न करण्याऐवजी लिव्हइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

पण गेल्या तीन वर्षांपूर्वी शेख सय्यद कुवैतमध्ये चालकाच्या नोकरीसाठी गेला होता. तो हिंदुस्थानात परतला. पण त्याचे लग्न होणार होतं. ही गोष्ट त्याची लिव्हइन पार्टर्नर जयाला कळाले. तिने लग्नाच्या ठिकाणी धाव घेतली. आणि शेखच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न केला. पण हे अ‍ॅसिड शेखऐवजी त्याच्या काकीच्या अंगावर हे अ‍ॅसिड पडले. हे अ‍ॅसिड टॉयलेट साफ करण्याचे असल्यामुळे शेखच्या काकीला फार त्रास झाला नाही.

जयाने अ‍ॅसिड फेकल्याने शेख चिडला. त्याने तिथेच असलेला चाकू घेतला आणि जयावर हल्ला केला. ही बाब शेखच्या होणाऱ्या पत्नीला आणि कुटुंबीयांनी कळाली म्हणून त्यांनी लग्नच मोडलं.

दुसरीकडे अ‍ॅसिड हल्ला केला म्हणून जयावर गुन्हा दाखल झाला. तर चाकूने हल्ला केला म्हणून शेखवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;