अवघ्या 23 वर्षीय मुलीला गमावल्यानंतर अभिनेत्रीची हृदयद्रावक पोस्ट; दाटून येईल कंठ!

अवघ्या 23 वर्षीय मुलीला गमावल्यानंतर अभिनेत्रीची हृदयद्रावक पोस्ट; दाटून येईल कंठ!

प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री दिव्या सेठ यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीला गमावलं. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी दिव्या यांची मुलगी मिहिकाचं निधन झालं होतं. तिच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुलीच्या निधनाच्या सात दिवसांनंतर आता दिव्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. मुलीसोबतचा फोटो पोस्ट करत त्यांनी अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुलगी मिहिकासोबत फोटो पोस्ट करत दिव्या यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘माझी झाल्याबद्दल धन्यवाद.’ या पोस्टवर कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी लिहिलंय, ‘दिव्या तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबीयांसाठी ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे. अशा वेळी शब्दांत काही व्यक्त करता येत नाही. मिहिकासारखीच तू सतत आमच्या विचारात असतेस. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, हे सगळं समजून घेणंच खूप कठीण आहे. तुला जगातील सर्व प्रेम मिळो.’ याशिवाय अभिनेते गजराज राव आणि टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा यांनीसुद्धा दिव्या यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Divya Seth Shah (@divyasethshah)

अभिनेता रोहित रॉयनेही मिहिकाला श्रद्धांजली वाहणारी एक पोस्ट लिहिली आहे. ‘तुझे आई-वडील जरी दुसरे असले तरी तू नेहमीच माझ्यासाठी माझी मुलगी आहेस आणि कायम असशील. मला माहित असलेल्या सर्वांत गोड आणि संवेदनशील मुलींपैकी तू एक होतीस. आईला वाढदिवशी सरप्राइज देण्यासाठी तू किती उत्सुक होतीस, हे मला अजूनही आठवतंय. जेव्हा तू मला बाय रोहित पापा म्हणालीस, तेव्हा मी माझ्या सर्वांत वाईट स्वप्नातही असा विचार केला नव्हता की तू ते अखेरचं म्हणतेय. मी प्रार्थना करतो की तू जिथे कुठे असशील, तिथून कोणत्या ना कोणत्या रुपात तुझ्या आईवडिलांकडे परत ये. आपण लवकरच भेटू.’

23 वर्षीय मिहिका ही बऱ्याच काळापासून आजारी होती. अखेर 5 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. मिहिकाची आजी सुषमा सेठ यांनी ‘कल हो ना हो’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘राम तेरी गंगा मैली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर मिहिकाच्या आईने ‘जब वी मेट’, ‘दिल धडकने दो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आणि ‘हम लोग’, ‘अभिमान’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;