दोन-चार कपडे काढले असते तर..; विनेश फोगटबद्दल भाजप नेत्याच्या पोस्टवरून संताप; गायिका म्हणाली ‘आक थू!’

दोन-चार कपडे काढले असते तर..; विनेश फोगटबद्दल भाजप नेत्याच्या पोस्टवरून संताप; गायिका म्हणाली ‘आक थू!’

अवघ्या 100 ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे भारताची अनुभवी कुस्तीगीर विनेश फोगटचं ऑलिम्पिक सुवर्णपदकाचं स्वप्न अधुरंच राहिलं. 50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेशचं अंतिम फेरीच्या दिवशी वजन अधिक भरल्याने तिला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून थेट अपात्र ठरवण्यात आलं. या धक्कादायक घटनेनंतर देशभरातील तिच्या लाखो चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. देश-विदेशातून त्यावर विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. पदक कमावलं नसलं तरी विनेशच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं मत काहींनी मांडलं. तर काहींनी विनेशवर टीकासुद्धा केली. अशातच एका भाजप नेत्याच्या कमेंटवरून सोशल मीडियावर नवीन वाद सुरू झाला. या कमेंटचा केवळ जाट समाजाने विरोधच केला नाही तर त्याविरोधात एफआयआरसुद्धा दाखल केली आहे. इतकंच नव्हे तर लोकगायिका नेहा सिंह राठोडनेही संबंधित भाजप नेत्याला सुनावलं आहे.

विनेश फोगटबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या व्यक्तीचं नाव विशाल वार्षणेय आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर या व्यक्तीने त्याच्या नावापुढे भाजप असं लिहिलं आहे. त्यामुळे ही व्यक्ती भाजपचा नेता किंवा कार्यकर्ता असल्याचं मानलं जातंय. विनेश अपात्र ठरल्यानंतर त्याने पोस्ट लिहिली, ‘लैंगिक शोषणाचा आरोप तर केलाच होता. दोन-चार कपडे काढून टाकले असते तर 200 ग्रॅम वजन कमी भरलं असतं.’ याच पोस्टवरून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जाट समाजाने या पोस्टचा विरोध केला असून त्यांनी एफआयआरसुद्धा दाखल केली.

नेहा सिंह राठोडने सुनावलं

या वादादरम्यान प्रसिद्ध लोकगायिका नेहा सिंह राठोडनेही संबंधित भाजप नेत्याला सुनावलं आहे. भाजप नेत्याच्या पोस्टवर तिने लिहिलं, ‘आक थू!’ नेहा सोशल मीडियावर विविध मुद्द्यांवर बेधडकपणे मतं मांडताना दिसते. विनेशबद्दल अशी पोस्ट लिहून केवळ तिचाच नाही तर देशाचाही अपमान केल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

विनेशने उपांत्य फेरीत क्यूबाच्या युस्नेलिस गुझमान लोपेझचा 5-0 गुणांनी पराभव केला होता. विनेशच्या या कामगिरीने भारताचं स्पर्धेतील चौथं पदक निश्चित झालं होतं. मात्र अंतिम सामन्यापूर्वी ती अपात्र घोषित झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. फायनलच्या दिवशी विनेशचं वजन काही ग्रॅम्सने जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;