विनेश फोगाटला मिळणार ‘सुवर्णपदक’, भारतरत्नसाठीही शिफारस, कुणी केली ही घोषणा?
हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिने फ्रान्समधील पॅरिस येथे ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत 50 किलो वजनी गटात खेळताना एकामागोमाग तीन सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र अंतिम फेरीपूर्वी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे ती ऑलिम्पिक पदकालाही मुकली. अर्थात या निर्णयाविरोधात तिने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादामध्ये (सीएएस) धाव घेतली असून यावरील सुनावणीही पूर्ण झाली आहे. या खटल्याचा निर्णय 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता जाहीर केला जाणार आहे. या निर्णयाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले असताना हरयाणातील खाप पंचायतीनेही मोठा निर्णय घेतला आहे.
विनेश फोगाटला ऑलिम्पिक रौप्यपदक मिळणार की नाही हे मंगळवारी स्पष्ट होणार असले तरी तत्पूर्वीच खाप पंचायतीने मोठी घोषणा केली आहे. खाप पंचायत विनेशचे स्वागत विजेत्या खेळाडूसारखेच करेल. तसेच खापच्या वतीने तिला सुवर्णपदक देऊ गौरविण्यात येईल. खाप पंचायतीने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
सर्वखाप पंचायत ने लिया एक बड़ा फैसला कहां विनेश के भारत लौटने पर किया जाएगा भव्य समारोह और सर्वखाप पंचायत बहन विनेश को पहनाएगी गोल्ड मेडल और कहा म्हारी बेटी म्हारी शान हैं । – सर्वखाप पंचायत
जाट समाज
@highlight #विनेश_फोगाट #VineshPhogat @Phogat_Vinesh pic.twitter.com/XMpJ88pr0b
— Maharaja Surajmal Youth Briged (@MSurajmal1) August 10, 2024
‘सीएएस’ने विनेशला विचारले तीन प्रश्न
विनेश फोगाटच्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे, परंतु ‘सीएएस’ने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. सीएएसने विनेशला ई-मेलद्वारे तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. यातील पहिला प्रश्न, तुला दुसऱ्या दिवशीही वजन करावे लागेल या नियमाची कल्पना होती का? दुसरा प्रश्न हा रौप्यपदकाशी संबंधित आहे. क्यूबन कुस्तीपटू तुमच्यासोबत रौप्यपदक शेअर करेल का? आणि तुम्हाला या याचिकेवरील निर्णय सार्वजनिकपणे जाहीर करायचा आहे की गोपनीय पद्धतीने तो जाहीर करायचा आहे? असे प्रश्न विनेशला विचारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.


Comment List