मनू, सरबज्योतने सरकारी नोकरी नाकारली; सुवर्णपदकासाठी खेळावरच लक्ष्य केंद्रित करणार

मनू, सरबज्योतने सरकारी नोकरी नाकारली; सुवर्णपदकासाठी खेळावरच लक्ष्य केंद्रित करणार

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला पदके जिंकून देणारे मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या दोन्ही नेमबाजांना हरियाणा सरकारने नोकरीची ऑफर दिली होती, मात्र दोघांनीही हे सरकारी काम करण्यास नकार दिला आहे. आम्ही नोकरीसाठी नव्हे, तर सुवर्णपदकांसाठी खेळत आहे. त्यामुळे सध्या तरी आम्हाला नोकरी नकोय.

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे मीडिया समन्वयक मुकेश वशिष्ठ यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मनू भाकर आणि सबरज्योत सिंग यांना क्रीडा विभागात उपसंचालकपदाची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांनी सरकारी नोकरी करणार नसल्याचे स्पष्ट केले. दोघांचे म्हणणे आहे की, आम्हाला सध्या खेळावरच लक्ष्य केंद्रित करायचे आहे. आम्ही नोकरीसाठी नव्हे, तर सुवर्णपदकांसाठी खेळत आहे.

दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणाऱ्या मनू भाकरला क्रीडा मंत्रालयाने 30 लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे. क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांची आज मनू भाकरने भेट घेतली. ‘त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल व प्रोत्साहनाबद्दल खूप आभार. त्यांच्या अविरत प्रयत्नांनी देशाचे खेळाडू आणखी उंच शिखरावर पोहोचतील अशी मला खात्री आहे,’ असे मनू भाकरने सोशल मीडियावर ट्विट करत म्हटले आहे. यासोबतच सरबज्योत सिंगला हरियाणा सरकारने 2.50 कोटी रुपयांचे रोख बक्षीसही देऊ केले आहे. हरियाणाचे क्रीडामंत्री संजय सिंह यांनी हे बक्षीस जाहीर केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;