अनंतनागनंतर किश्तवाडमध्ये धुमश्चक्री; गोळीबार सुरूच; जखमी नागरिकाचा रुग्णालयात मृत्यू

अनंतनागनंतर किश्तवाडमध्ये धुमश्चक्री; गोळीबार सुरूच; जखमी नागरिकाचा रुग्णालयात मृत्यू

अनंतनागनंतर आज किश्तवाडमध्ये हिंदुस्थानी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. किश्तवाड जिह्यातील जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. शोधमोहिमेदरम्यान दोन्ही बाजूंनी काही काळ गोळीबार झाला. अधुनमधून लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमधील संघर्ष आणखी तीव्र होत असल्याचे चित्र आहे.  दरम्यान, अनंतनागमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या नागरिकाचा आज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते.

लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिस नौनट्टा, नागेनी पेयास आणि आसपासच्या परिसरात दहशतवाद्यांची शोधमोहीम राबवत आहेत. दहशतवाद्यांना टीपून ठार करण्यासाठी लष्कराचे जवान संपूर्ण परिसर पिंजून काढत आहेत. संपुर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शनिवारी अनंतनागच्या कोकरनाग येथे दहशतवाद्यांच्या गोळीबारात हवालदार दीपक कुमार यादव आणि लांस नायक प्रवीण शर्मा शहीद झाले होते. 3 जवान आणि 2 नागरिकही जखमी झाले होते. यातील एका नागरिकाचा आज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

चार दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी

जम्मू-कश्मीरच्या कठुआ पोलिसांनी 4 दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत. हे दहशतवादी शेवटचे कठुआ जिह्यातील मल्हार, बानी आणि सोजधरच्या ढोक येथे दिसले होते. या दहशतवाद्यांबद्दल माहिती देणायांना 5 लाख रुपये बक्षिसाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, डोडा-कठुआ येथे 24 दहशतवादी लपल्याची शक्यता लष्कराने वर्तवली आहे.

अनंतनागच्या कोकेरनाग पट्टय़ात अहलान गागरमांडू जंगलात 10 हजार फूट उंचीवर दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने धुमश्चक्री उडाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;