बेट दिले नाही म्हणून अमेरिकेने सत्तेतून हटवले; पलायनानंतर हसीना यांचा पहिला आरोप

बेट दिले नाही म्हणून अमेरिकेने सत्तेतून हटवले; पलायनानंतर हसीना यांचा पहिला आरोप

अमेरिकेला सेंट मार्टिन बेट वापरण्यासाठी दिले नाही म्हणूनच मला सत्तेतून हटवण्यात आल्याचा आरोप बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. तसेच बांगलादेशातील नागरिकांना वाचवण्यासाठीच पदाचा राजीनामा दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राजीनामा देऊन हिंदुस्थानात पलायन केल्याच्या सहा दिवसांनंतर शेख हसीना यांनी याबद्दल भाष्य केले असून एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. दरम्यान, लवकरच पुन्हा मायदेशी परतेन, असेही त्यांनी म्हटले आहे.

कट्टरपंथीयांनी सुरू केलेल्या हिंसाचारात मरण पावणाऱ्यांचा आकडा वाढू नये यासाठी  मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांना विद्यार्थ्यांच्या मृतदेहावर चढून सत्ता काबीज करायची होती, पण मी पद सोडून त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्याचा दावा शेख हसीना यांनी केला आहे. मी अमेरिकेला सेंट मार्टिन बेट आणि बंगालची खाडी देऊन खुर्ची वाचवू शकले असते, असेही शेख हसीना यांनी म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना कधीच रझाकार संबोधले नाही

मी विद्यार्थ्यांना कधीच रझाकार संबोधले नाही. देशात अस्थिरता आणण्यासाठी माझे शब्द चुकीच्या पद्धतीने पेरून दाखवण्यात आले. बांगलादेशातील जनतेच्या साधेपणाचा फायदा उचलून माझ्याविरोधात षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप शेख हसीना यांनी केला आहे. दरम्यान, अमेरिकेला सेंट मर्टिन बेटावर लष्करी तळ उभारायचा होता, असा दावा जून 2021 मध्ये बांगलादेशातील वर्तमानपत्रात करण्यात आला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;