फडणवीस 15 दिवस का शांत होते? अनिल देशमुख यांचा सवाल

फडणवीस 15 दिवस  का शांत होते? अनिल देशमुख यांचा सवाल

देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच सचिन वाझे आणि परमबीर सिंह पोपटासारखे बोलताहेत, अशी टीका करतानाच, फडणवीसजी! तुम्ही 15 दिवस का शांत होता? आता माझ्यावर आरोप करावयाचे तुम्हाला आठवले काय? असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांनी आज ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात ट्विट केले आहे. फडणवीसांसह भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना अटक करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्लॅन होता, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्या वक्तव्याला फडणवीस यांनीही दुजोरा दिल्याने अनिल देशमुख यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दोन पोपट बोलताहेत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना खोटय़ा केसेसमध्ये अडकवण्याचे कारस्थान फडणवीस यांनी रचले होते. ते पंधरा दिवसांपूर्वी मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणले होते. आता फडणवीस वाझे आणि परमबीर या पोपटांकरवी माझ्यावर आरोप करत आहेत, असे देशमुख म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;