मणिपूरमध्ये माजी आमदाराच्या घरात बॉम्बस्फोट; पत्नीचा मृत्यू

मणिपूरमध्ये माजी आमदाराच्या घरात बॉम्बस्फोट; पत्नीचा मृत्यू

हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांगपोकपी जिल्ह्यात सायकुलचे माजी आमदार यामथोंग हाओकीप यांच्या घरात शनिवारी दुपारी बॉम्बस्फोट झाला. यात यामथोंग यांच्या पत्नी चारुबाला हाओकिप यांचा मृत्यू झाला. राज्यात हिंसाचार सुरू असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली.

यामथोंग हाओकिप यांनी 2012 आणि 2017 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर सैकुल येथून निवडणूक लढवली होती. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यामथोंग यांच्या घराच्या आवारातील कचऱ्यामध्ये आयईडी बॉम्ब ठेवण्यात आला होता. यामथोंग यांच्या पत्नी कचरा जाळला असता त्यातील बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात चारुबाला यांचा मृत्यू झाला. सुदैवाने इतर कुणालाही दुखापत झाली नाही.

याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. दरम्यान, कौटुंबिक वादातून हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. यामथोंग यांनी काकांच्या नातवाच्या शेजारी जमीन खरेदी केली होती. याच जमिन खरेदीच्या वादातून स्फोट घडवल्याचा संशय असून त्यादृष्टीने पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;