अक्षय कुमार करतोय दुसरे लग्न?, ट्विंकल खन्ना त्रस्त, अभिनेत्रीचा हैराण करणारा खुलासा…

अक्षय कुमार करतोय दुसरे लग्न?, ट्विंकल खन्ना त्रस्त, अभिनेत्रीचा हैराण करणारा खुलासा…

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा कायमच चर्चेत असतो. अक्षय कुमार याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, अक्षय कुमार याच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळत नाहीये. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तो आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतो. अक्षय कुमार हा बॉलिवूडचा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला चार चित्रपट रिलीज होतात. अक्षय कुमार हा काही दिवसांपूर्वीच विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याने घातलेल्या जीन्सची जोरदार चर्चा रंगताना दिसली. विशेष म्हणजे अक्षय कुमारच्या या जीन्सची किंमत लाखांच्या घरात होती.

अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, चित्रपटांपासून दूर असली तरीही ट्विंकल खन्ना ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच ट्विंकल खन्नाने हैराण करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. ट्विंकल खन्नाची ही पोस्ट पाहून सर्वचजण हैराण झाले होते. 

ट्विंकल खन्ना हिने थेट म्हटले की, काही दिवसांपासून मला पीरियड्स येत नाहीत. त्यामुळे मला भीती वाटत आहे की, मी प्रेग्नंट असण्याची. ट्विंकल खन्ना ही 49 वर्षी बाळाला जन्म देणार का? हा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात होता. आता ट्विंकल खन्ना हिने व्लॉगमध्ये अत्यंत मोठा खुलासा केलाय. हेच नाही तर तिने पती अक्षय कुमारकडून मोठे वचन देखील घेतले आहे. 

ट्विंकल खन्ना हिने अक्षय कुमारला म्हटले की, माझे जर तुझ्या अगोदर निधन झाले तर तू विषारी गवत खा. मी माझ्या पतीला त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत फिरताना अजिबातच पाहू शकत नाही. मी खरं सांगते की, मी भूत होऊन येईल आणि तुमच्या दोघांनाही त्रास देईल. यावर अक्षय कुमार पत्नीला थेट उत्तर देतानाही दिसतोय. 

अक्षय कुमार म्हणतो की, जर तू आता शांत बसली नाही तर मी आताच विषारी गवत खाईल. कमीत कमी मला तुझी ही बकवास आता तरी ऐकायला मिळणार नाही. चिमण्याचे उदाहरण सुरूवातीला देताना ट्विंकल खन्ना ही दिसली. मात्र, पतीच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करून ट्विंकल खन्ना ही चांगलीच त्रस्त होताना दिसत आहे. ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;