माजलेले वळू आहेत, त्यांना कात्रजचा घाट दाखवू, आता मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

माजलेले वळू आहेत, त्यांना कात्रजचा घाट दाखवू, आता मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली सुरू आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. जरांगे पाटील यांनी कात्रजमध्ये शांतता रॅली घेत राज्य सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मला साथ द्या, मागे हटू नका, मी देखील आता मागे हटणार नाही, त्यांनी मला घेरायचं ठरवलं आहे, पण आपण त्यांच्या छाताडावर पाय ठेऊन पुढे जाऊ,असा निर्धारही जरांगे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये एकी नाही, असे सांगत काहीजण फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना पुणेकरांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. काही जणांनी आपल्या समाजाला खूप हिणवले आहे. पुणेकरांनी आपली एकजूट दाखवून दिली आहे. आरक्षण मिळेपर्यंत मला साथ द्या, मागे हटू नका मीदेखील मागे हटत नाही. अशीच एकजूट दाखवा, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

मुंबईतील काहीजणांना माज आला आहे, तो माज उतरवयाचे औषध मराठ्यांजवळ आहे. महाराष्ट्रातले जेवढे जेवढे माजलेले वळू आहेत त्यांना कात्रजचा घाट दाखवू. तुमची लेकरं मोठी व्हावीत, यासाठीच हे सर्व सुरू आहे. आता माझा जीव गेला तरी मी मागे हटणार नाही, असा निर्धारही जरांगे पाटील यांनी केला. यावेळी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत उपस्थितांनी परिसर दणाणून सोडला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;