राजस्थानमध्ये दुर्देवी घटना, आंघोळीसाठी गेलेल्या 7 तरुणांना बुडून मृत्यू

राजस्थानमध्ये दुर्देवी घटना, आंघोळीसाठी गेलेल्या 7 तरुणांना बुडून मृत्यू

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात दुर्देवी घटना घडली आहे. बाणगंगा नदीत आंघोळीला गेलेल्या 7 तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. हे सर्व तरुण 18 ते 22 वयोगटातील आहेत. ग्रामस्तांनी घटनेच्या तासाभरानंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले.

संततधार पावसामुळे बाणगंगा नदीच्या पाण्यात वाढ झाली होती. आठ तरुण आंघोळीला गेले होते. मात्र पाण्यात असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले तर त्यापैकी एकजण बचावला. त्याने गावात जाऊन ग्रामस्थांना घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी सात तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच, काही मुले दफन केली जाण्याची भीती आहे. यावेळी झील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन (15), सौरभ सिंह (16) भूपेंद्र (18), शांतनु (18), लक्खी (20), गौरव (16) पवन (22) पुत्र सुगड़ सिंह अशी मृतांची नावे आहेत. जेसीबीद्वारे तिथे वाळू उपसा केल्याने तिथे खड्डा झाला होता.

सर्व तरुणांचे मृतदेह एकाच ठिकाणी आढळून आले. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह लेक बडा रुग्णालयात नेण्यात आला, जिथे त्यांचे शवविच्छेदन केले जाईल. हे तरुण येथे रील बनवण्यासाठी आले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;