सलमान खान याने पहिल्यांदाच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला, माझी गर्लफ्रेंड…

सलमान खान याने पहिल्यांदाच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला, माझी गर्लफ्रेंड…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याला काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हेच नाही तर सलमान खान याच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आलीये. 14 एप्रिलला सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला. यानंतर मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपींना अटक केलीये. मात्र, सतत सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. अभिनेता हा कायमच त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

सलमान खान याने आतापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना डेट केले आहे. मात्र, सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची. सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे लग्न करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांचे लग्न होऊ शकले नाही. सलमान खानने कतरिना कैफ हिलाही डेट केले आहे.

संगीता बिजलानी, सोमी अली, कतरिना कैफ आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबतचे अफेअर सलमान खानचे सर्वाधिक चर्चेत राहिलेले आहेत. बऱ्याच वेळा असेही सांगितले गेले की, सलमान खान हा एकाच वेळी दोन मुलींना देखील डेट करतो. मात्र, यावर अभिनेत्याने कधी भाष्य केले नाही. 

एका शोमध्ये सलमान खान याला थेट त्याच्या गर्लफ्रेंडबद्दलच विचारण्यात आले. यावेळी पहिल्यांदाच यावर बोलताना सलमान खान म्हणाला की, माझी एकच गर्लफ्रेंड आहे. यावेळी त्याला थेट त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव देखील विचारण्यात आले. मात्र, आपल्या गर्लफ्रेंडचे नाव सांगणे टाळताना सलमान खान हा दिसला. सलमान खान हा आता 58 वर्षाचा आहे. मात्र, त्याने अजूनही लग्न केले नाहीये. अनेक अभिनेत्रींसोबत कायमच सलमान खानचे नाव जोडले जाते.

चाहते सतत सलमान खानला त्याच्या लग्नाबद्दल विचारताना दिसतात. मात्र, आपल्या लग्नाबद्दल भाष्य करणे कायमच टाळताना सलमान खान हा दिसतो. सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. विशेष म्हणजे सलमान खानचे हे चित्रपट धमाका करताना देखील दिसत आहेत. सलमान खानला बॉलिवूडचा बिग बी देखील म्हटले जाते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;