Sheikh Hasina News : मी परत येईन, शेख हसीना यांनी न केलेल्या भाषणाची चर्चा
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान यांनी सध्या भारतात आश्रय घेतला आहे. राजीनामा देण्यापूर्वी त्या भाषणही देणार होत्या. पण काही कारणास्तव ते राहून गेलं. बांगलादेशात मी परत येईन असे ते या भाषणात म्हणणार होत्या.
इकॉनॉमिक टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. शेख हसीना या देश सोडण्यापूर्वी आपल्या देशविसियांना संबोधित करणार होत्या. याबाबत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांने सांगितले आहे. बांगलादेशात झालेल्या सत्तापरिवर्तनाला हसीना यांनी अमेरिकेला दोषी ठरवले आहे. जर आपल्याला संधी मिळाली असती तर आपण हे भाषणात म्हटलं असतं असे हसीना म्हणाल्या.
हसीना यांनी आपल्या जवळच्या एका सहकाऱ्याला एक संदेश पाठवला होता. त्यात हसीना म्हणाल्या की मला देशात मृतदेहांचा खच पहायचा नव्हता आणि म्हणून मी राजीनामा दिला. त्यांना विद्यार्थ्यांच्या मृतदेहांवर आपली सत्ता आणायची आहे. जर मी मार्टिन बेटावरचा हक्क अमेरिकेसाठी सोडला असता तर मी सत्तेत राहिले असते. यामुळे अमेरिकेला बंगालच्या उपसागरात वर्चस्व निर्माण करता आलं असतं. पण मी असे केले नाही. बांगलादेशच्या नागरिकांनी कट्टर लोकांच्या नादी लागू नये असे आवाहनही हसीना यांनी केले आहे.
जेव्हा माझ्या नेत्यांच्या खुनाची माहिती मिळाली तेव्हा मला फार दुःख झाले, देशात झालेली जाळपोळ आणि हिंसाचार पाहून मला फार वेदना झाल्या. देवाच्या कृपेने मी परत येईन. आवामी लीग पक्ष पुन्हा उभा राहिल असे म्हणत हसीना यांनी बांगलादेशच्या भविष्यासाठी प्रार्थना केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List