आमिर खानचं मोठं वक्तव्य, ‘माझ्याकडे कदाचित फक्त 15 वर्ष शिल्लक, म्हणून मला…’

आमिर खानचं मोठं वक्तव्य, ‘माझ्याकडे कदाचित फक्त 15 वर्ष शिल्लक, म्हणून मला…’

अभिनेता आमिर खान याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनयाच्या प्रवासात आमिरच्या आयुष्यात असे अनेक क्षण आले जे कधीही विसरण्यासारखे नाहीत. अशात एक दिवसांमधील एक दिवस म्हणजे 9 ऑगस्ट… 9 ऑगस्ट हा दिवस आमिर खान आणि त्याच्या कुटुंबियांसाठी फार खास ठरला. कारण आमिर खान निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ सिनेमा सुप्रीम कोर्टात दाखवण्यात आला. याचदरम्यान आमिर आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (धनंजय यशवंत चंद्रचूड) यांच्याशी संवाद साधला. सांगायचं झालं तर, लिंग संवेदना कार्यक्रमाचा एक भाग असल्यामुळे सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग सुप्रीम कोर्टात ठेवण्यात आली. त्यात सर्वोच्च न्यायालयातील अनेक न्यायाधीश सहभागी झाले होते.

यावेळी आमिर खान याने मोठी घोषणा केली आहे. अनेक वर्ष अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्याने निवृत्तीची हिंट दिली. अभिनेता म्हणाला, ‘लापता लेडिज सिनेमा मी का निर्मित केला? कोवीड – 19 दरम्यान माझ्या लक्षात आलं की आता प्रॉडक्शन माझ्या करियरचा अंत असू शकतो. तेव्हा मी 56 वर्षांचा होतो. कदाचित माझ्याकडे आणखी 15 वर्ष शिल्लक आहेत. जेथे मी माझं काम करु शकतो… आपल्या देशाने समाजाने आणि इंडस्ट्रीने मला खूप काही दिलं आहे. एका वर्षात एक सिनेमा करायचा असा मी विचार केला आहे… पण सिनेमाची निर्मिती… मला अशा कथांकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे, ज्यांमध्ये काही वेगळेपण आहे…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘मी नवीन आवाज आणि कथांना संधी देऊ शकतो जो या संपूर्ण प्रक्रियेचा एक भाग आहे. ‘लापता लेडीज’ हे माझ्या दिग्दर्शनातील पहिलं पाऊल आहे. मला अशा प्रकारची प्रतिभा पुढे नेण्याची इच्छा आहे आणि वर्षातून 45 चित्रपटांची निर्मिती करण्याचा विचार करत आहे.’ असं देखील अभिनेता म्हणाला…

किरण राव म्हणाली, ‘आमिर खान याने 2020 मध्ये स्क्रीन राइटर्स एसोसिएशनमध्ये भाग घेतला होता. सिनेमाची कथा त्याठिकाणी ऐकली आणि आम्ही सिनेमाचे राईट्स विकत घेण्याचा विचार केला. सिनेविश्वात वेगात अनेक गोष्टी बदल आहेत. त्यामुळे आम्हाला शक्य होतील तितक्या नव्या कथी आम्ही मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करू…’ असं देखील किरण राव म्हणाली.

सांगायचं झालं तर, ‘लापता लेडीज’ सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. सोशल मीडियावर देखील सिनेमातील काही सीन तुफान गाजले. सिनेमातील प्रत्येक कास्टला चाहत्यांकडून प्रेम मिळालं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;