दहशतवाद संपवल्याचे मोदी सरकारचे दावे हवेत, कश्मीरमध्ये हल्ल्यात दोन जवान शहीद

दहशतवाद संपवल्याचे मोदी सरकारचे दावे हवेत, कश्मीरमध्ये हल्ल्यात दोन जवान शहीद

केंद्रातील मोदी सरकारचे सर्व दावे फोल ठरले असून जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. अनंतनाग जिह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज जोरदार धुमश्चक्री उडाली असून त्यात दोन जवान शहीद झाले आहेत तर 4 जवान जखमी झाले आहेत. हल्ल्यात दोन स्थानिक रहिवासीही जखमी झाले आहेत. 10 हजार फूट उंचीवर रात्री उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती.

अनंतनाग जिह्यात कोकेरनागमधील अहलानच्या जंगलात शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. त्याला लष्कराच्या जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. यादरम्यान सहा जवान जखमी झाले.  त्यातील दोन जवानांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

आठ महिन्यांत सहा दहशतवादी हल्ले

जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ले रोखण्यात केंद्रातील भाजपचे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. गेल्या 78 दिवसांत कश्मीरात 11 दहशतवादी हल्ले झाले असून गेल्या तीन वर्षांत 47 जवान शहीद झाले आहेत. यात या वर्षी आतापर्यंत सहा मोठे हल्ले झाले असून त्यात कॅप्टन, हवाईदलाचा एक अधिकारी आणि 10 जवान शहीद झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;