कीटक नियंत्रण उद्योग आरोग्य मंत्रालयाच्या नियंत्रणात आणा, ‘फाओपमा’ पेस्ट समिटमध्ये मागणी

कीटक नियंत्रण उद्योग आरोग्य मंत्रालयाच्या नियंत्रणात आणा, ‘फाओपमा’ पेस्ट  समिटमध्ये मागणी

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने होणाऱ्या कामाचा विचार केला तर कीटक नियंत्रण विभागाचे काम आरोग्य क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने हा विभाग कृषी मंत्रालयापेक्षा आरोग्य मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आणणे गरजेचे आहे. शिवाय परवाना वितरण सुसूत्रीकरण आणि सेवाविषयक सुविधांच्या देशात सुयोग्य, एकसमान वितरण पद्धती आणण्याची गरज असल्याची मागणीही या समिटमध्ये उद्योजकांकडून करण्यात आली.

कीटक नियंत्रण उद्योगातील संस्था इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ एशिया ओशियन पेस्ट मॅनेजर्स असोसिएशन (फाओपमा) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत तीन दिवसीय समिट नुकतीच पार पडली. या समिटमध्ये कीटक व्यवस्थापन व्यावसायिक आणि आशिया व इंडो ओशियन 17 देशांच्या संघटनांचा सहभाग  घेतला. या ‘फाओपमा’ पेस्ट समिटमध्ये सुमारे 700 प्रतिनिधी आणि 300 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कीटक व्यवस्थापन पंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये जगभरातील तज्ञ उद्योजकांनी कीटकनाशक विभागासमोरील आव्हाने आणि संधी व सुधारणांबाबत चर्चा केली. कीटकनाशक क्षेत्राचे जनजीवन आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी किती महत्त्व आहे, हेदेखील अधोरेखित करण्यात आले. कोविड महामारीच्या काळात याची प्रचीती आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी आयपीसीएचे अध्यक्ष उदय मेनन, उपाध्यक्ष गोपी नायर उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल कंवल जीत सिंग धिल्लन यांचा सत्कार करण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;