फेमस आरजे करणार बिग बॉसच्या घरात वाईल्डकार्ड एन्ट्री?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

फेमस आरजे करणार बिग बॉसच्या घरात वाईल्डकार्ड एन्ट्री?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

बिग बॉस मराठीची सध्या जोरदार चर्चा आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमध्ये भन्नाट स्पर्धक आहेत. त्यामुळे सोशल मीडियासह महाराष्ट्रभर चर्चा होत असते. सोशल मीडियावर आपल्या आवडत्या स्पर्धकांना सपोर्ट केला जातोय. आर जे सुमितदेखील इन्स्टाग्रामवर वेगवेगळे रील शेअर करत असतो. बिग बॉसचा हा सिझन सुरु झाल्यापासून तो बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांच्याबाबतचे व्हीडिओ बनवतो. त्याच्या या व्हीडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. पण त्याच्या व्हीडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चाहते त्याच्याकडे एक मागणी करत आहेत.

आरजे सुमित बिग बॉसच्या घरात दिसणार?

बिग बॉस खेळाशी संबंधित सुमितच्या व्हीडिओवर नेटकरी कमेंट करत आहेत. तुला बिग बॉसच्या घरात बघायला आवडेल. दादा खरंच तुम्हाला 100% बिग बॉसमध्ये आम्हाला बघायला आवडेल. सो प्लीज ट्राय करा, अशा कमेंट सुमितच्या व्हीडिओवर पाहायला मिळतात. त्यानंतर आरजे सुमितनेही एक व्हीडिओ शेअर करत बिग बॉसमध्ये जाण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे आरजे सुमित बिग बॉसच्या घरात वाईल्डकार्ड एन्ट्री करणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

व्हीडिओत नेमकं काय?

तुमच्या सगळ्याचं प्रेम बघून खूप भारी वाटतंय… प्रत्येक व्हीडीओच्या खाली तुम्ही लोकांनी कमेंट केली आहे की भावा… बिग बॉसच्या घरात जावं लागतंय, वाईल्ड कार्ड एन्ट्री घ्यावी लागतीय, अशा व्हीडिओच्या खाली तुम्ही लोक करताय. पण जर तुम्हाला खरंच असं वाटतंय की बिग बॉसच्या घरात मी जायला पाहिजे. तर या व्हीडिओवर कमेंट करा. बिग बॉस मराठी, कलर्स मराठी, रितेश देशमुख आणि केदार शिंदे यांना मेन्शन करा. जर तुमचा हा मेसेज बिग बॉसच्या टीमपर्यंत पोहोचला तर आपली वाईल्ड कार्ड एन्ट्री फिक्स आहे. लावा ताकद…, असा व्हीडिओ सुमितने शेअर केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by RJ Sumit (@rjsumitt)

सुमित आरजे अर्थात रेडिओ जॉकी आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याचे रील्स तरूणाईमध्ये फेमस आहेत. वैभव चव्हाण आणि धनंजय पोवार या दोघांना सुमित सपोर्ट करताना दिसतो. निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यातील वादावरही सुमिने एक रील शेअर केलं होतं. पण आता स्वत: सुमितच बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;