बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याने केला जया बच्चन यांच्याबद्दल तो खुलासा, म्हणाला, मला मेसेज करून…

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याने केला जया बच्चन यांच्याबद्दल तो खुलासा, म्हणाला, मला मेसेज करून…

सध्या तुफान चर्चेत असणारे एक नाव म्हणजे जया बच्चन. जया बच्चन या चांगल्याच चर्चेत आहेत. जया बच्चन यांचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांना जया अमिताभ बच्चन या नावाने बोलल्यामुळे त्या चांगल्याच भडकल्याचे बघायला मिळतंय. जया बच्चन यांचे म्हणणे आहे की, महिलेची एक वेगळी स्वतंत्र अशी ओळख असते. प्रत्येकवेळी तिला तिच्या पतीसोबतच्या नावाने ओळखणे चुकीचे आहे. जया बच्चन या फक्त अभिनय क्षेत्रामध्येच नाही तर त्या राजकारणातही चांगल्याच सक्रिय आहेत. जया बच्चन यांचे अनेक व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

अभिनेता अरशद वारसी याने जया बच्चन यांच्याबद्दल मोठा खुलासा केलाय. अरशद वारसी याने बॉलिवूडमध्ये पर्दापण तेरे मेरे सपने चित्रपटापासून केले. अरशद वारसी म्हणाला की, तेरे मेरे सपने चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्हाला हैद्राबादला जायचे होते. त्यावेळी मी जाताना बनियान आणि चड्ढीवर गेलो. मात्र, याची भनक ही जया बच्चन यांना लागली.

जया बच्चन यांनी मेसेज करत म्हटले की, प्रवास करताना थोडे नीट कपडे घाला. अरशद वारसी पुढे म्हणाला की, एकदा जया जी यांनी मला एका चित्रपटाबद्दल माझा सल्ला घेण्यासाठी बोलावले होते. त्यांनी मला विचारले की, कसा वाटला चित्रपट? मी त्यांना थेट म्हणालो की, बकवा,…त्यानंतर त्यांनी मला दुसरीकडे नेले आणि थेट म्हटले की, तुझे विचार तुझ्याकडेच ठेव.

काही गोष्टी आपल्याला बॉलिवूडमध्ये शिकण्यास उशीर झाल्याचेही म्हणताना अरशद वारसी हा दिसला. जिथे तुम्ही खरे बोलले की, ग्राह्य धरले जाणार नाही तिथे खरे बोलूच नका ही गोष्टी मला शिकायला मिळाल्याचे सांगताना अरशद वारसी हा दिसला. अरशद वारसी हा बच्चन पांडे चित्रपटामध्ये धमाकेदार भूमिका करताना दिसला होता. अरशद वारसी नेहमीच चर्चेत असतो.

अरशद वारसी याने आता जया बच्चन यांच्याबद्दल केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. अरशद वारसी हा मोठ्या संपत्तीचा मालक देखील आहे. अरशद वारसीने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. अरशद वारसी हा त्याच्या आगामी चित्रपटावर सध्या काम करताना दिसत आहे. अरशद वारसीचा चाहता वर्गही तसा मोठा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;