Nagar News – चोरी प्रकरणातील आरोपीची पोलिसांच्या हातावर तुरी; वैद्यकीय चाचणीदरम्यान रुग्णालयातून पलायन

Nagar News – चोरी प्रकरणातील आरोपीची पोलिसांच्या हातावर तुरी; वैद्यकीय चाचणीदरम्यान रुग्णालयातून पलायन

महिला वकिलाच्या घरी दागिने, रोख रक्कम आणि कोर्टाच्या कामकाजाची कागदपत्रे चोरणाऱ्या चोरट्याने पोलिसांच्याच हातावर तुरी दिली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात वेद्यकीय चाचणीसाठी नेले असता चोरट्याने संधी साधून पलायन केले. किरण बबन कोळपे असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी गुरुवारी दुपारी अ‍ॅड. नाजमीन वजीर बागवान यांच्या घरी घुसला. त्यानंतर त्याने बागवान यांचा हात पिरगळत त्यांना मारहाण केली. तसेच बागवान यांच्या घरातीत कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि आरोपीविरोधात दाखल मोक्का कोर्ट केस कामकाजाची मूळ कागदपत्रे नेली.

याप्रकरणी बागवान यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर शुक्रवारी पुन्हा आरोपीने बागवान यांचा पाठलाग केला. बागवान यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यावर कोतवाली पोलिसांनी चांदणी चौक परिसरात त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र पोलिसांनी योग्य खबरदारी न घेतल्याने सदर आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला आहे.

किरण कोळपे विरोधात 2022 मध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याचे वकीलपत्र फिर्यादी यांच्याकडे होते. त्यावेळी फिर्यादी व किरण यांची ओळख झाली होती. दरम्यान, किरण विरोधात 2023 मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला मोक्का लावण्यात आला होता. या गुन्ह्याचे कामकाजही फिर्यादी पाहत होत्या. त्याला या गुन्ह्यात अटक झाली होती व नंतर जामीन मिळाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;